Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराजची बायको धोनीचा आशिर्वाद घेण्यासाठी खाली वाकताच, पाहा MS ने काय केलं? Video

Ruturaj Gaikwad Marriage : क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार अखेर काल लग्नबंधनात अडकले. CSK ने IPL 2023 ची ट्रॉफी जिंकल्यानंतरचा दोघांचा एक व्हिडिओ आता समोर आलाय.

Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराजची बायको धोनीचा आशिर्वाद घेण्यासाठी खाली वाकताच, पाहा MS ने काय केलं? Video
ruturaj gaikwad wife utkarsha pawar
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 1:11 PM

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सने कमालीचा खेळ दाखवून इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन जिंकला. फायनलमध्ये गुजरात टायटन्सला हरवून चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएलच विजेतेपद मिळवलं. या विजयानंतर एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर CSK च्या चाहत्यांनी धोनीच कौतुक केलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात ऋतुराज गायकवाडची बायको उत्कर्षाने धोनीला शुभेच्छा दिल्या व नंतर त्याचा आशिर्वाद घेतला.

हा व्हिडिओ ऋतुराजचा लग्न झाल नव्हतं, तेव्हाचा आहे. काल शनिवारी ऋतुराज गायकवाडने उत्कर्षा बरोबर लग्न केलं.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये?

CSK च्या टीमच विजयाच सेलिब्रेशन सुरु होतं. सगळे खेळाडू एकत्र होते. त्यावेळी ऋतुराजची बायको उत्कर्षा तिथे आली. उत्कर्षाने धोनीच्या पायाला स्पर्श केला. अचानक झालेल्या या प्रकराने धोनी थोडा आश्चर्यचकीत झाला. त्याने तिला हाताला धरुन उचललं व ऋतुराज गायकवाडकडे इशारा केला. धोनीचा इशारा पाहून ऋतुराज मागे झाला. जणू उत्कर्षा आता आपलेच पाय पकडणार असं ऋतुराजला वाटलं.

ऋतुराजची बायको सुद्धा क्रिकेटर

चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जाडेजाच्या बायकोने सुद्धा त्याचे पाय पकडले. हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता उत्कर्षा सुद्धा धोनीच्या पाया पडताना दिसली. उत्कर्षा स्वत: क्रिकेटर आहे. महाराष्ट्राच्या वुमेन्स टीमकडून ती खेळतो. ती वेगवान गोलंदाजी करते.

ऋतुराजने आयपीएल 2023 मध्ये किती सिक्स मारले?

चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवण्यात अनेक खेळाडूंनी योगदान दिलं. पण ऋतुराज गायकवाडने आपल्या बॅटने विशेष योगदान दिलं. गायकवाडने आयपीएल 2023 मध्ये 16 सामन्यात 42.14 च्या सरासरीने 590 धावा केल्यात. ऋतुराजचा स्ट्राइक रेट सुद्धा 147.50 चा होता. गायकवाडच्या बॅटमधून 4 हाफ सेंच्युरी निघाल्यात. गायकवाडने या सीजनमध्ये 30 सिक्स मारले. ऋतुराज गायकवाडने मागच्या आयपीएल सीजनमध्ये विशेष चांगली कामगिरी केली नव्हती. यावेळी त्याने आपल्या बॅटची ताकत दाखवून चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका अदा केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.