SA vs IND, 1st Test: टीम इंडियाच्या लंच मेन्यूमध्ये चिकन चेट्टीनाद, लँब चॉप्स

पावसामुळे आज सकाळचे सत्र वाया गेले. पंचांनी खेळपट्टीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे आज लवकर लंच ब्रेक घेण्यात आला.

SA vs IND, 1st Test: टीम इंडियाच्या लंच मेन्यूमध्ये चिकन चेट्टीनाद, लँब चॉप्स
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 7:48 PM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनवर (Centurion) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्यादिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवले. पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही टीम इंडियाच्या (Team india) फलंदाजांना मैदानात उतरता आले नाही. संघासाठी ही निराशाजनक बाब असली, तरी दुसऱ्या बाजूला टीम इंडियातील खेळाडूंनी आज सुपर स्पोटर्स पार्कच्या स्टेडियममध्ये दुपारच्या भोजनात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

टीम इंडियाच्या लंचमध्ये आज ब्रॉसकोली सूप, चिकन चेट्टीनाद, पिवळी डाळ, लँब चॉप्स आणि व्हेजिटेबल कडाई या खाद्यपदार्थांचा समावेश होता. पावसामुळे आज सकाळचे सत्र वाया गेले. पंचांनी खेळपट्टीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे आज लवकर लंच ब्रेक घेण्यात आला.

पावसाची बॅटिंग

आज सकाळी खेळाला सुरुवात होण्याआधी सेंच्युरियनमध्ये पाऊस कोसळत होता. त्यामुळे सामना विलंबाने सुरु होईल असे वाटले. पाऊस थांबल्यानंतर ग्राऊंड स्टाफने मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. पंचांनी सामना सुरु करण्याआधी मैदानाचे निरीक्षण करायचेही ठरवले. पण अधन-मधन पावसाचा खेळ सुरुच होता. अखेर पाऊस थांबणार नसल्याची चिन्हे दिसल्यानंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. आज दोन्ही संघातील खेळाडू मैदानात उतरु शकले नाहीत. त्यामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द झाला. आता कसोटीचे फक्त तीन दिवस उरले आहेत.

काल पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवलं होतं. दिवसअखेरीस भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या होत्या. सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकावल असून तो (122) धावांवरुन उद्या डाव पुढे सुरु करेल. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) साथ देईल. रहाणे (40) धावांवर नाबाद आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.