SA VS IND | दक्षिण आफ्रिकेत इंडियाचा खेळाडू आजारी, टीममधून नंबर 1 बॉलर ‘आऊट’
South Africa vs India 2nd T20I Playing 11 | पहिला टी 20 सामना हा पावसामुळे वाया गेल्यानंतर अखेर दुसऱ्या सामन्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या सुरुवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये काही न पटणारे बदल केले गेले आहेत.

ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात टॉस जिंकला. दक्षिण आफ्रिका कॅप्टन एडन मारक्रम याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. त्यामुळे टीम इंडियाचे फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकासमोर किती धावांचं आव्हान ठेवतात याकडे लक्ष असणार आहे. हा सामना टीम इंडियाच्या 11 खेळाडूंसाठी खास आहे. कारण हे 11 खेळाडू पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत खेळत आहेत. सूर्यकुमार यादव याची कॅप्टन म्हणून नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने या सामन्यात आश्चर्यकारक बदल केले आहेत. आयसीसी टी 20 रँकिंमधील नंबर 1 बॉलरला वगळण्यात आलं आह. तर स्टार ओपनर बॅट्समन हा आजारी पडला आहे.
कोण आऊट कोण आजारी?
शुबमन गिल याला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. शुबमनच्या संधीमुळे कोणा एका ओपनरला बाहेर बसावं लागणार हे स्पष्ट होतं.त्यामुळे दोघांपैकी एकाला बाहेर जावं लागणार होतं. मात्र ऋतुराज आजारी असल्याने तो या सामन्याला मुकला आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. तर आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये नंबर 1 असलेल्या रवी बिश्नोई याला संधी देण्यात आलेली नाही. तसेच श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांना संधी मिळाली नाही. तर दीपक चाहर हा देखील कौटुंबिक कारणामुळे टीममधून बाहेर आहे.
ऋतुराज गायकवाड आजारी
🚨 Here’s #TeamIndia‘s Playing XI 🔽
Follow the Match 👉 https://t.co/4DtSrebAgI
𝗡𝗢𝗧𝗘: Ruturaj Gaikwad was unavailable for selection for the 2nd #SAvIND T20I due to illness. pic.twitter.com/K52YOOgbwn
— BCCI (@BCCI) December 12, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.