SA vs IND: अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकवताच गावस्करांचे शब्द बदलले, आता म्हणतात…

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा 3 आणि राहणे शुन्यावर बाद झाल्यानंतर गावस्कर यांनी रहाणे आणि पुजाराकडे कसोटी करीयर वाचवण्यासाठी दुसऱ्या डावात शेवटची संधी आहे, असे विधान केले होते.

SA vs IND: अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकवताच गावस्करांचे शब्द बदलले, आता म्हणतात...
inside sport
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 3:07 PM

जोहान्सबर्ग: “अजिंक्य रहाणे (Ajinklya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) खराब पद्धतीने बाद होत नसतील, दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्य़ा डावात त्यांनी जी फलंदाजी केली, तसा खेळ ते दाखवत असतील, तर त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे” असे सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा 3 आणि राहणे शुन्यावर बाद झाल्यानंतर गावस्कर यांनी रहाणे आणि पुजाराकडे कसोटी करीयर वाचवण्यासाठी दुसऱ्या डावात शेवटची संधी आहे, असे विधान केले होते. (SA vs IND Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara should be backed Sunil Gavaskar)

रहाणे आणि पुजारामुळे हे शक्य झालं दुसऱ्याडावात दोघांनी अर्धशतकी खेळी केल्यानंतर गावस्करांनी आता त्यांची पाठराखण केली आहे. भारताने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य दिले. त्यात रहाणे आणि पुजाराची खेळी महत्त्वाची होती. कॅप्टन डीन एल्गरच्या झुंजार खेळीमुळे भाराताने हा सामना गमावला व दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

म्हणून टीम त्यांच्या पाठिशी उभी राहिली “अनुभव आणि याआधी केलेल्या कामगिरीमुळे संघ रहाणे आणि पुजाराच्या पाठिशी उभा राहिला. चांगली कामगिरी करु शकतो, असा विश्वास त्यांच्यामध्ये होता आणि त्यांनी ते करुन दाखवलं” असे गावस्कर स्टार स्पोटर्सवर म्हणाले. “काही वेळा आपण आपल्या वरिष्ठ खेळाडूंबद्दल कठोर होतो. कारण तरुण खेळाडू तयार असतात, त्यांना देखील संधी मिळावी, असे आपल्याला वाटत असते. पण जो पर्यंत हे वरिष्ठ खेळाडू चांगला खेळ दाखवतायत, चुकीच्या पद्धतीने आऊट होत नाहीयत, तो पर्यंत आपण त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे” असे गावस्कर म्हणाले.

गावस्कर काय म्हणाले होते? पुजाराने 33 चेंडूत फक्त तीन धावा केल्या. रहाणे गोल्डन डकवर बाद झाला. दोघे ज्या पद्धतीने बाद झाले, त्यानंतर गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना कसोटी करीअर वाचवण्यासाठी रहाणे आणि पुजाराकडे आता फक्त एक डाव उरला आहे, असे विधान केले. “आता दोघांच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्न विचारले जातील. आता त्यांच्याकडे फक्त एक डाव उरला आहे. त्यात काही करु शकले, तरच संघात स्थान टिकवू शकतील” असे गावस्कर म्हणाले.

संबंधित बातम्या:

PM Security|पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून सर्वोच्च न्यायालयाची चपराक; म्हणे, दुर्मिळातील दुर्मिळ घटना…काय झालं कोर्टात! Ashes, ENG vs AUS: अरे देवा! बॉल स्टम्पला लागला, अंपायरने LBW दिला, तरीही बॅट्समन नॉट आऊट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लिखाण, नवी मुंबईत भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

(SA vs IND Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara should be backed Sunil Gavaskar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.