SA vs IND WC T20 Final 2024 Highlights Score: टीम इंडियाने 11 वर्षानंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी, कोच राहुल द्रविडला हॅप्पी सेंड ऑफ

| Updated on: Jun 30, 2024 | 8:44 AM

south Africa vs team india, ICC T20 world cup 2024 Final Highlights In Marathi: टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील खेळलेले सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत पोहचले होते. मात्र टीम इंडियाने अंतिम फेरीत बाजी मारत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

SA vs IND WC T20 Final 2024 Highlights Score: टीम इंडियाने 11 वर्षानंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी, कोच राहुल द्रविडला हॅप्पी सेंड ऑफ
team india t20 world cup trophy

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्स गमावून 169 धावांपर्यंतच मजल मारता आली.  टीम इंडियाची रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिली आणि अंतिम फेरीत खेळण्याची ही तिसरी वेळ होती. तर दक्षिण आफ्रिकेची ही वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी होती. मात्र टीम इंडियाने सामन्यात अखेरच्या क्षणी जोरात कमबॅक केलं आणि इतिहास रचला. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही 2007 नंतरची पहिली आणि एकूण दुसरी वेळ ठरली. तर टीम इंडियाने टी वर्ल्ड कप जिंकत 2013 नंतर आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Jun 2024 01:56 AM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: टीम इंडिया विश्व विजेता

    टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यात 7 धावांनी मात करत टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने अडखळत झालेल्या सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक करत सामन्यावर घटट् पकड मिळवली होती. मात्रा अखेरच्या काही षटकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल बॉलिंग करत अफलातून कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावावंर रोखण्यात यश मिळवलं.  टीम इंडियाने यासह टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2013 नंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

  • 29 Jun 2024 11:33 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: भारताने वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली

    भारताने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 7 धावांनी हा सामना जिंकला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत टीम इंडियाला कमबॅक करून दिलं.

  • 29 Jun 2024 11:26 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: कॅच विन मॅचेस..! सूर्यकुमार यादवचा जबरदस्त झेल

    सूर्यकुमार यादवने जबरदस्त झेल घेतला. या कॅचमुळे टीम इंडिया गेममध्ये आली आहे. दक्षिण अफ्रिकेला 5 चेंडूत 16 धावांची आवश्यकता आहे.

  • 29 Jun 2024 11:14 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: मार्को यान्सेन आऊट

    जसप्रीत बुमराहने मार्को यान्सेन याला बोल्ड केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने सहावी विकेट गमावली आहे. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

  • 29 Jun 2024 11:05 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: हेन्रिक क्लासेन आऊट

    हार्दिक पंड्याने हेन्रिक क्लासेन याला आऊट केलंय. क्लासेनच्या रुपात दक्षिण आफ्रिकेने पाचवी विकेट गमावली आहे. क्लासेनने 27 बॉलमध्ये 52 धावा केल्या.

  • 29 Jun 2024 10:48 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: क्विंटन डी कॉक आऊट

    टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला आहे. अर्शदीप सिंहच्या बॉलिंगवर कुलदीप यादव याने क्विंटन डी कॉकचा कॅच घेतला. डी कॉकने 31 बॉलमध्ये 39 धावा केल्या.

  • 29 Jun 2024 10:06 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: कॅप्टन एडन मार्करम आऊट

    टीम इंडियाने दुसरी विकेट मिळवली आहे. अर्शदीप सिंहने दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्रक्रम याला विकेटकीपर ऋषभ पंतच्या हाती कॅच आऊट केलं. मार्रक्रमने 4 धावा केल्या.

  • 29 Jun 2024 09:58 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका

    जसप्रीत बुमराहने रिझा हेंड्रिक्सला क्लिन बोल्ड करत दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला आहे. हेंड्रिक्सने 4 धावा केल्या.

  • 29 Jun 2024 09:50 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: क्विंटन डी कॉक-रिझा हेंड्रिक्स सलामी जोडी मैदानात

    दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी 177 धावांचा पाठलाग करायला मैदानात आली आहे. रिझा हेंड्रिक्स आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 29 Jun 2024 09:46 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान, टीम इंडियाचे बॉलर रोखणार का?

    टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाकडून विराट कोहली 76, अक्षर पटेल 47 आणि शिवम दुबे याने केलेल्या 27 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 176 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कगिसो रबाडा आणि मार्को जान्सेन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

  • 29 Jun 2024 09:33 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: विराट कोहली आऊट

    विराट कोहलीने 59 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्ससह 76 रन्स केल्या. विराटला संपूर्ण स्पर्धेत आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. मात्र विराटने निर्णायक क्षणी अंतिम सामन्यात 76 धावा करत टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला.

  • 29 Jun 2024 09:21 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Score: विराट कोहलीचं अर्धशतक

    विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये अर्धशतक ठोकलंय. मात्र विराटने अर्धशतकासाठी 48 बॉलचा सामना केला आहे. त्यामुळे विराटने संथ अर्धशतक केल्याचं म्हटलं जात आहे.

  • 29 Jun 2024 08:44 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: टीम इंडियाच्या 10 ओव्हरमध्ये 75 धावा

    टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 75 धावा केल्या आहेत. रोहित, पंत आणि सूर्यकुमार आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती  3 बाद 34 अशी झाली होती. मात्र त्यानंतर विराट आणि अक्षर पटेल या दोघांनी टीम इंडियाचा डावा सावरला. आता या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

  • 29 Jun 2024 08:22 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: सूर्यकुमार यादव आऊट

    टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. कगिसो रबाडा याने आपल्या बॉलिंगवर सूर्याला हेन्रिक क्लासेनच्या हाती कॅच आऊट केला.

  • 29 Jun 2024 08:13 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: ऋषभ पंत डक

    टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर एकाच ओव्हरमध्ये झटपट 2 विके्टस गमावल्या आहेत. केशव महाराजने आधी रोहितला हेन्रिक क्लासेन आणि ऋषभ पंत या दोघांना आऊट केलंं. रोहितने 9 धावा केल्या. तर ऋषभ पंत भोपळाही फोडू शकला नाही.

  • 29 Jun 2024 08:09 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: कॅप्टन रोहित शर्मा आऊट

    टीम इंडियाने पहिली आणि मोठी विकेट गमावली आहे. कॅप्टन रोहित शर्मा 9 धावा करुन कॅच आऊट झाला आहे. केशव महाराज याने आपल्या बॉलिंगवर रोहितला हेन्रिक क्लासेन याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 29 Jun 2024 08:00 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग

    दक्षिण आफ्रिका टीम इंडिया फायनलला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 29 Jun 2024 07:45 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.

  • 29 Jun 2024 07:45 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन

    दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

  • 29 Jun 2024 07:39 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: महामुकाबल्यात टीम इंडियाने टॉस जिंकला

    टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2024 महाअंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. कॅप्टन रोहितने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

  • 29 Jun 2024 06:56 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस

    टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनल सामन्याला सुरुवात होण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी आहेत. सामन्याला रात्री 8 वादता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टॉससाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.

  • 29 Jun 2024 05:55 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final 2024 LIVE Updates: रोहितच्या नावे सर्वाधिक धावा तर अर्शदीपच्या नावे सर्वात जास्त विकेट्स

    टीम इंडियासाठी या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 248 धावा केल्या आहेत. तर अर्शदीप सिंहने 15 विकेट्स घेतल्या आहेत. दोघांनी ही कामगिरी गेल्या 7 सामन्यांमध्ये केली आहे.

  • 29 Jun 2024 04:21 PM (IST)

    SA vs IND Final Live Updates: दक्षिण आफ्रिकेचा जोरदार सराव, आयसीसीकडून फोटो पोस्ट

    दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलसाठी जोरदार सराव केला आहे. आयसीसीने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा नेट्समध्ये सरावा करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

    दक्षिण आफ्रिका फायनलसाठी सज्ज

  • 29 Jun 2024 03:26 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: केन्सिंग्टन ओव्हलची खेळपट्टी प्रोव्हिडन्सपेक्षा वेगळी असेल

    केन्सिंग्टन ओव्हलची खेळपट्टी प्रॉव्हिडन्सच्या खेळपट्टीपेक्षा वेगळी आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत करते. नवीन चेंडू टाकताना स्विंग मिळेल. नंतर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते.

  • 29 Jun 2024 12:30 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: टीम इंडियाची इथवरची कामगिरी

    टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर सुपर 8 मध्ये टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम राखली. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  • 29 Jun 2024 12:00 PM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: दक्षिण आफ्रिकेची इथवरची कामगिरी

    दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळीतील 4 आणि सुपर 8 मधील 3 सामने जिंकले. तसेच उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

  • 29 Jun 2024 11:30 AM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत दोघांपैकी कोण यशस्वी

    आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत उभयसंघात एकूण 6 वेळा आमनासामना झालाय. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे.

  • 29 Jun 2024 11:00 AM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: हेड टु हेड रेकॉर्ड्स

    टीम इंडिया -दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 26 टी20i सामने झाले आहेत. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 26 पैकी 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेला 11 सामन्यात यश मिळवता आलं आहे.

  • 29 Jun 2024 10:00 AM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: टीम इंडिया

    टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

  • 29 Jun 2024 09:47 AM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: दक्षिण आफ्रिका टीम

    दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.

  • 29 Jun 2024 09:24 AM (IST)

    SA vs IND WC T20 Final LIVE Updates: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने

    आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे करण्यात आलं आहे.

Published On - Jun 29,2024 9:15 AM

Follow us
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
रस्त्यावरच महाकाय मगरीचा कॅटवॉक, नागरिकांमध्ये खळबळ, बघा थरारक व्हिडीओ.
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या
संभाजी भिडेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या भडकल्या.
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात
महिलांबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्यानं संभाजी भिडे वादाच्या भोवऱ्यात.
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?
अजित दादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग? थोरल्या पवारांचा डाव नेमका काय?.
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द
जिंकल्यानंतर विराट रोहितचा टी20 क्रिकेटला अलविदा, बघा त्यांची कारकीर्द.
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?
आता नाव घेऊन पाडणार, मनोज जरांगे पाटील यांनी काय दिला थेट इशारा?.
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
वटसावित्रीच्या पुजेबद्दल संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?.
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ
‘लाडकी बहिण’ योजनेसाठी कोण पात्र? 'ही' मोठी अट, तरच मिळणार लाभ.
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं
महायुती सरकारला २ वर्ष पूर्ण, FB पोस्ट करत CM शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं.