AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : टीम इंडिया विरुद्धच्या तिन्ही मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा

South Africa Sqaud Against Team India For T20I Odi And Test Series | टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात एकूण 3 मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेने टीम जाहीर केली आहे.

SA vs IND : टीम इंडिया विरुद्धच्या तिन्ही मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेची घोषणा
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 2:40 PM

केप टाऊन | टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्व यंग ब्रिगेडने कांगारुंचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या तिन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेने तिन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिका मॅनेजमेंटने टी 20 आणि वनडे सीरिजसाठी कॅप्टन बदलला आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये कर्णधार म्हणून टेम्बाने आपल्या नेतृत्लात दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवलं. मात्र वैयक्तिक कामगिरीत बावुमा फ्लॉप ठरला. त्यामुळे टेम्बा बावुमा याचं कर्णधारपद मॅनेजमेंटने काढून घेतलं आहे. टेम्बाऐवजी टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये एडन मारक्रम हा नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बावुमा याच्याकडे कसोटी मालिकेचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तसेच कगिसो रबाडा यालाही टी 20 आणि वनडे सीरिजसाठी संधी देण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

टेम्बा आणि रबाडा या दोघांना कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी व्हाईट बॉल सीरिजमधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तसेच टीममध्ये मिहलाली म्पोंगवाना, डेव्हिड बेडिंघम आणि नांद्रे यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर वेगवान गोलंदाज नांद्रे याची तिन्ही मालिकांसाठी निवड करण्यात आली आहे. तर डेव्हिड याला कसोटी आणि मिहलाली याला वनडे सीरिजमध्ये निवडण्यात आलं आहे. तसेच ट्रिस्टन स्टब याला पहिल्यांदाच कसोटीत स्थान देण्यात आलं आहे.

तिन्ही मालिकांसाठी दक्षिण आफ्रिका टीम

दक्षिण आफ्रिका  20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाड विलियम्स, गेराल्ड कोएत्झी, मार्को जानेसन आणि लुंगी एन्गिडी. (शेवटच्या तिघांना पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी)

एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका टीम | एडन मारक्रम (कॅप्टन), बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जॉर्जी, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेविड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, रासी वेन डेर डुसे, कायल वेरेयेन आणि लिजाड विलियम्स.

कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका | टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेराल्ड, टोनी डी जोरजी, डीन एल्गर, मार्को जानेसन, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर, लुंगी एंगिडी, कीगन पीटरसन, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरिन.

बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.