SA vs IND: विराट कोहलीचं अर्धशतक, अक्षरची वादळी खेळी, दक्षिण आफ्रिकेला 177 रन्सचं टार्गेट

South Africa vs India Final 1st Innings: विराट कोहली आणि अक्षर पटेल या जोडीने टीम इंडियासाठी टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक धावा केल्या.

SA vs IND: विराट कोहलीचं अर्धशतक, अक्षरची वादळी खेळी, दक्षिण आफ्रिकेला 177 रन्सचं टार्गेट
virat kohli and axar patelImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 10:24 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनल महामुकाबल्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. टीम इंडियाकडून अनुभवी फलंदाज विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर अक्षर पटेल याने निर्णायक क्षणी टीम इंडिया अडचणीत असताना 47 धावांची शानदार खेळी केली. तर शिवम दुबेने 27 धावांची उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराज आणि एनरिख नॉर्खिया या दोघांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाने टॉस जिंकून कॅप्टन रोहितने फिल्डिंगचा निर्णय घेतला. विराट कोहली आणि रोहित या सलामी जोडीने 1.4 ओव्हरमध्ये 23 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर 3 विकेट्स झटपट गमावल्या. रोहित 9, ऋषभ पंत 0 आणि सूर्यकुमार याव 3 धावा करुन बाद झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 बाद 34 अशी झाली. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल या दोघांनी चांगली खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला 100 पार पोहचता आलं. मात्र त्यानंतर अक्षर पटेल दुर्देवी ठरला.अक्षर थोडक्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. अक्षरने 31 बॉलमध्ये 47 धावा जोडल्या.

अक्षरनंतर विराटने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अर्धशतकापर्यंत संथ खेळणाऱ्या विराट कोहलीने टॉप गिअर टाकला आणि फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूने शिवम दुबेने चांगली साथ दिली. विराट कोहलीने फटकेबाजी सुरु केली. मात्र विराट अखेर आऊट झाला. विराटने 59 बॉलमध्ये 76 धावा केल्या. विराटनंतर शिवम दुबे आऊट झाला. शिवमने 16 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 27 रन्स केल्या. रवींद्र जडेजा 2 धावांवर बाद झाला. तर हार्दिक पंड्याने नाबाद 5 धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून महाराज आणि नॉर्खिया व्यतिरिक्त मार्को जान्सेन आणि कगिसो रबाडा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.