SA vs WI T20 : दुसऱ्या मॅचमध्ये 500 पेक्षा जास्त धावांचा पाऊस, दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज तिसरी सामनाही रोमांचक
SA vs WI T20 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज T20 सीरीज खूपच रोमांचक झाली. दुसऱ्या सामन्यात 500 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडला होता.
SA vs WI 3rd T20 : दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमधील T20 सीरीज खूपच रोमांचक ठरली. तिसरा आणि शेवटचा सामनही रंगतदार झाला. जाहोन्सबर्गमध्ये झालेला तिसरा सामना वेस्ट इंडिजने 7 धावांनी जिंकला. वेस्ट इंडिजने तीन टी 20 सामन्यांची सीरीज 2-1 अशी जिंकली. या मॅचमध्ये सुद्धा धावांचा पाऊस पडला. पण वेस्ट इंडिजची टीम विजयी ठरली. टी 20 सीरीजआधी वेस्ट इंडिजने कसोटी मालिका गमावली होती. वनडे सीरीज 1-1 अशी बरोबरीत सुटली होती.
टी 20 सीरीजचा पहिला सामना वेस्ट इंडिजने तीन विकेटने जिंकला. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन केलं. 258 धावांच लक्ष्य 7 चेंडू बाकी असताना गाठलं. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा स्फोटक बॅटिंग केली. त्यांनी 220 धावा फटकावल्या. यजमान दक्षिण आफ्रिकेची टीम अल्जारी जोसेफसमोर टिकू शकली नाही.
वेस्ट इंडिजचा तुफानी खेळ
वेस्ट इंडिजने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 8 विकेट गमावून 220 धावा केल्या. यात 16 सिक्स आणि 13 फोर मारले. मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरपासून वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्र स्वीकारला. तीन ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजची धावसंख्या 40 झाली. चौथ्या ओव्हरमध्ये रबाडाने मार्यसला 17 आणि त्यानंतर चार्ल्सला शुन्यावर बाद केलं. दोन चेंडूत दोन विकेट घेतल्या.
अल्जारी जोसेफ आणि रोमारियो शेफर्डने 26 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. रबाडाने लास्ट ओव्हरमध्ये 26 धावा दिल्या. मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा पराभव
दक्षिण आफ्रिकेच्या टीमने अल्जारी जोसेफसमोर सरेंडर केलं. त्यांनी धीमी सुरुवात केली. क्विंटन डिकॉकचा विकेट लवकर गमावला. त्यानंतर रीजा हॅडरिक्स आणि रायली रूसोने डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने रुसोला आऊट करुन ही भागीदारी मोडली. त्यानंतर हॅडरिक्सला चांगली साथ मिळाली नाही. हॅडरिक्सला 83 रन्सवर अल्जारीने बाद केलं. एडन मार्करम अखेरीस तुफानी फलंदाजी केली. त्याने 35 धावा केल्या. पण तो पर्यंत उशीर झाला होता. जोसेफने डेविड मिलर, क्विंटन डिकॉक, हेनिरक क्लासेन, रीजा हेंडरिक्स आणि वाइने पर्नेलचा विकेट घेतला.