लास्ट ओव्हरमध्ये फुल ड्रामा, 6 बॉलमध्ये 3 रन्सची गरज, समोर होता Mumbai indians चा बॉलर सॅम करन

सामना इतका खेचला जाईल, याची क्रिकेट चाहत्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत थांबाव लागेल, इतक्या धावांची आवश्यकता नव्हती. पण बॉलरला दाद द्यावी लागेल, त्याच्या बॉलिंगमुळे सामन्यात इतका रोमांच निर्माण झाला.

लास्ट ओव्हरमध्ये फुल ड्रामा, 6 बॉलमध्ये 3 रन्सची गरज, समोर होता Mumbai indians चा बॉलर सॅम करन
PC v MICTImage Credit source: sat20 league
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 9:22 AM

डरबन : T20 हा क्रिकेटचा छोटा फॉर्मेट आहे. या फॉर्मेटमध्ये बहुतांश अटी-तटीचे सामने पहायला मिळतात. T20 क्रिकेटमध्ये अनेकदा रोमांच टिपेला पोहोचतो. अनेक रंगतदार, श्वास रोखून धरायला लावणारे सामने T20 फॉर्मेटमध्ये होतात. त्यामुळेच T20 क्रिकेट अन्य दोन फॉर्मेटच्या तुलनेत जास्त लोकप्रिय आहे. या फॉर्मेटमध्ये वेगवान क्रिकेट पहायला मिळते. एक-दोन आव्हर्सही सामन्याची दिशा बदलण्यासाठी पुरेशा ठरतात. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी 20 लीगमध्ये असेच सामने पहायला मिळतायत. शनिवारी मुंबई इंडियन्स केपटाऊन आणि प्रिटोरिया कॅपिटल्समध्ये एक मॅच झाली. प्रिटोरिया कॅपिटल्सने हा सामना 1 विकेटने जिंकला. या मॅचमध्ये चाहत्यांना क्रिकेटचा सर्वोच्च रोमांच अनुभवता आला.

बॉलरला दाद द्यावी लागेल

हा सामना लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलपर्यंत चालला. सामना इतका खेचला जाईल, याची क्रिकेट चाहत्यांना अजिबात अपेक्षा नव्हती. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत थांबाव लागेल, इतक्या धावांची आवश्यकता नव्हती. पण बॉलरला दाद द्यावी लागेल, त्याच्या बॉलिंगमुळे सामन्यात इतका रोमांच निर्माण झाला.

रासीची स्फोटक बॅटिंग

सर्वप्रथम ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत कशी पोहोचली? ते जाणून घ्या. मुंबई इंडियन्स केपटाऊनने पहिली बॅटिंग केली. मुंबईची टीम पूर्ण 20 ओव्हर खेळू शकली नाही. मुंबई इंडियन्स केपटाऊनची टीम 19.4 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट झाली. रासी वॅन डर डुसेने मुंबई इंडियन्स केपटाऊनकडून सर्वाधिक धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा हा बॅट्समन ओपनिंगला आला होता. त्याने 175 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 29 चेंडूत 51 धावा फटकावल्या. यात 4 फोर आणि 4 सिक्स आहेत.

रायलीकडून जबरदस्त प्रत्युत्तर

प्रिटोरिया कॅपिटल्ससमोर 160 धावांच टार्गेट होतं. प्रिटोरिया कॅपिटल्सकडून रायली रुसोने 19 चेंडूत 40 धावा फटकावल्या. 210 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना 4 सिक्स मारले. त्याच्या बॅटिंगमुळे सामना लास्ट ओव्हरपर्यंत गेला. तिथे प्रिटोरिया कॅपिटल्सला विजयासाठी 6 चेंडूत 3 धावांची आवश्यकता होती. अशी होती लास्ट ओव्हर

मुंबई इंडियन्सचा बॉलर सॅम करनच्या हातात चेंडू होता. स्ट्राइकवर प्रिटोरिया कॅपिटल्सचा वेन पर्नेल होता. पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. दुसऱ्या चेंडूवर पर्नेलने सिंगल धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर सॅम करनने स्ट्राइकवर असलेल्या मुथुसामीला आऊट केलं. त्यानंतर जॉस लिटिल हा नवीन बॅट्समन स्ट्राइकवर आला. चौथ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. पाचवा चेंडूही निर्धाव टाकला. पण शेवटच्या चेंडूवर लिटिलने विजयासाठी आवश्यक असलेल्या 2 धावा काढल्या. एका रोमांचक सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.