HBD Sachin Tendulkar : विराट, धोनीपेक्षा सचिन ‘धनवान’, त्याच्याकडे इतक्या हजार कोटींची संपत्ती, जाणून घ्या

HBD Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर रिटायर आहे. विराट-धोनी अजून क्रिकेट खेळतायत. पण त्यांच्यापेक्षा पण जास्त पैसा सचिन तेंडुलकरकडे आहे. मुंबईतच नाही, सचिनने आणखी एका राज्यात आलिशान बंगला विकत घेतलाय.

HBD Sachin Tendulkar : विराट, धोनीपेक्षा सचिन 'धनवान', त्याच्याकडे इतक्या हजार कोटींची संपत्ती, जाणून घ्या
Sachin-Tendulkar-
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 10:07 AM

HBD Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. दोन-अडीच दशक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने आज वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केलय. क्रिकेटच्या मैदानात सचिनने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. सध्या सचिन तेंडुलकर रिटायरमेंटच आयुष्य जगतोय. पण आजही सचिनच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीय. लोक आजही सचिनला मास्टर-ब्लास्टर म्हणूनच ओळखतात.

सचिनच आयुष्य एका सर्वसामान्य कॉमन मॅन प्रमाणे सुरु झालं. आजही सचिन कॉमन मॅन सारखाच राहतोय. पण त्याच्याकडे पैसा, बँक बॅलन्स याची अजिबात कमतरता नाहीय. सचिनच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान लग्जरी गाड्या आहेत. आजच्या यशस्वी क्रिकेटपटूंपेक्षा पण सचिनकडे जास्त पैसा आहे. सचिन तेंडुलकरची नेटवर्थ किती आहे? त्याच्याकडे किती संपत्ती आहे? ते जाणून घ्या.

किती हजार कोटीची संपत्ती?

भारतीय क्रिकेटमधील सम्राट सचिन तेंडुलकरकडे आज कोट्यवधीची संपत्ती आहे. त्याने आपलं काम आणि नावाच्या बळावर कोट्यवधीची संपत्ती जमवली आहे. आज सचिन ज्या स्थानावर आहे, तिथपर्यंत पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाहीय. त्याने 16 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. आज सचिनकडे 1650 कोटींची संपत्ती आहे.

मुंबईशिवाय सचिनकडे अजून कुठल्या राज्यात बंगला विकत घेतलाय?

सचिनकडे मुंबईत वांद्रे येथे आलिशान बंगला आहे. त्याची किंमत 39 कोटी रुपये आहे. 2007 मध्ये सचिनने हा बंगला विकत घेतला होता. आता याच बंगल्याची व्हॅल्यू 100 कोटीच्या घरात आहे. त्याशिवाय BKC येथे आलिशान कोठी आहे. त्याची किंमत 8 कोटी रुपये आहे. मुंबईशिवाय सचिनने केरळमध्ये सुद्धा एक आलिशान बंगला विकत घेतलाय. त्याची किंमत 78 कोटी रुपये आहे. सचिन किती कोटीच्या कारमधून फिरतो?

सचिनला बंगल्याशिवाय आलिशान लग्जरी कार्सचा सुद्धा शौकीन आहे. त्याच्याकडे एकापेक्षाएक महागड्या गाडया आहेत. त्याच्याकडे सुरुवातीला मारुती 800 कार होती. आता सचिन 20 कोटीच्या कारमधून फिरतो. सचिनच्या लग्जरी कार कलेक्शनमध्ये फरारी 360 Moden, BMWi8, BMW7 series 750Li M sport, Nisaan GT-R , Audi Q7, BMW M6 Gran Coupe आणि BMW M5 30 Jahre या कारस आहेत.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....