T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियन विकेट्सवर कशी बॅटिंग करायची? Sachin Tendulkar ने उघड केलं ‘सिक्रेट’
Sachin Tendulkar: ऑस्ट्रेलियात खेळताना बुटांमध्ये कुठले स्पाइक्स असले पाहिजे ते विकेट्सवर कसं पळायचं? सचिनने सांगितलं 'सिक्रेट'. ज्यांनी ऐकलं त्यांचा चॅम्पियन बनण्याचा मार्ग सोपा
मुंबई: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) ऑस्ट्रेलियात सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील मैदानं खूप मोठी आहेत. त्यामुळे इथे चौकार-षटकार मारणं सोपं नाहीय. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा क्रिकेट विश्वातील सर्वकालिन महान फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर (Australian Wickets) कशी फलंदाजी करायची? त्याचं सिक्रेट सचिन तेंडुलकरने सांगितलं. सचिनच्या मते ऑस्ट्रेलियात रनिंग बिटविन द विकेट महत्त्वाचं आहे. इथे पळून धावा काढणं आवश्यक असल्याच सचिनने सांगितलं.
क्वालिफायर मॅचेसमध्ये काय दिसलं?
सचिनने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये कॉलम लिहिला आहे. रनिंग बिटविन द विकेट बद्दल सचिनने आपलं मत मांडलय. सचिनचा हा सल्ला ज्या फलंदाजाने ऐकला, त्याच्या यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. सचिनच्या आधी अनेक दिग्ग्जांनी सुद्धा हेच म्हटलय. ऑस्ट्रेलियात धावा पळून काढणं महत्त्वाच असेल. क्वालिफायर मॅचेसमध्ये सुद्धा हे दिसून आलय, चौकार-षटकार लगावणं सोपं नाहीय.
स्पाइक्सवर लक्ष देणं गरजेच
सचिनने ऑस्ट्रेलियन मैदानात बुटांचे स्पाइक्सही महत्त्वाचे असल्याचं सांगितलं. “ऑस्ट्रेलियन पीचेसवर मी मोठ्या स्पाइक्सचा सल्ला देईन. बॅटिंगला उतरण्याआधी मी स्पाइक्स शार्प करण्याचा सल्ला देईन. यामुळे पळायला सोपं पडेल. फिल्डिंगच्यावेळी सॉफ्ट स्पाइक्स चालतील. पण बॅटिंग करताना स्प्रिंटरवाले स्पाइक्स आवश्यक आहेत. या छोट्या-छोट्या गोष्टी मोठ्या परिणामकारक ठरु शकतात” असं सचिन तेंडुलकर म्हणाला.
धाव घेताना कसं पळायचं?
फलंदाजांनी कुठे पळायचं? ते सुद्धा सचिनने सांगितलं. फटका खेळल्यानंतर कुठे पळायचं? हा सुद्धा प्रश्न असतो. “ड्रॉप इन पीचेसवर कॉर्नरवर धावणं योग्य ठरेल. डावखुरा गोलंदाज असेल, तर नॉन स्ट्राइकवरचा फलंदाज लाइनच्या बाहेर उभा राहू शकतो आणि स्ट्राइक लाइनच्या आत धावता येईल. दोन्ही फलंदाजांना छोटे रुट काढावे लागतील. यासाठी आधीच बोलून ठेवावं लागेल” असं सचिन तेंडुलकर म्हणाला.