‘या’ कारणांमुळे भारतीय संघाचं WTC Final जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सचिन तेंडुलकरने सांगितली कारणं

न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (ICC World Test Championship Final) भारताच्या पराभवामागची वेगवेगळी कारणं मांडली जात आहेत.

'या' कारणांमुळे भारतीय संघाचं WTC Final जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सचिन तेंडुलकरने सांगितली कारणं
Sachin Tendulkar (File Photo)
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 7:37 PM

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (ICC World Test Championship Final) भारताच्या पराभवामागची वेगवेगळी कारणं मांडली जात आहेत. अनेक आजी-माजी क्रिकेटर, क्रिकेट समीक्षक त्यावर त्यांची मतं नोंदवत आहेत. दरम्यान भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेदेखील या पराभवाची कारणं सांगितली आहेत. सचिनच्या मते, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज चांगल्या भागीदाऱ्या करु न शकल्याने भारताचा पराभव झाला. (Sachin Tendulkar says lack of partnership was one of the reason behind India loss against New Zealand in WTC FInal)

अखेरच्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 64 धावा जमवल्या होत्या. पण त्यानंतर भारताने पुढच्या 106 धावांमध्ये उर्वरित 8 गडी गमावले. भारताने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या विकेट लवकर गमावल्या. परंतु तिथून भारतीय संघ सावरु शकला असता. परंतु तस झाले नाही. उर्वरित फलंदाज खेळपट्टीवर जम बसवू शकले नाहीत.

सचिन आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “मी सांगितले होते की शेवटच्या दिवशी पहिली 10 षटके खूप महत्त्वाची ठरतील. जर आपण ड्रिंक्स ब्रेक पर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलो असतो तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. कारण जलद धावा करण्याची क्षमता आपल्या संघाकडे आहे. रिषभ पंत मैदानात आला तेव्हा तो आणि इतर खेळाडू वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळत होते. आपल्याला इथून पुढे न्यूझीलंडला एक मोठं आव्हान द्यायचं आहे आणि त्यांचा संघ बाद करुन सामना जिंकायचा आहे, अशी मानसिकता आपल्या खेळाडूंमध्ये असायला हवी होती. त्यासाठी आपल्या फलंदाजांनी मोठ्या भागीदाऱ्या रचायला हव्या होत्या.

विराट-पुजाराच्या विकेट्सनंतर सामना हातून निसटला

सचिन म्हणाला की, आपल्या फलंदाजानी न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर संयमाने फलंदाजी करणं गरजेचं होत. खास करुन विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी दिवसाची सुरुवात केल्यावर दोन ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानेच सामना भारताच्या हातातून निसटला.

सुरुवातीची 10 षटकं महत्त्वाची

दरम्यान, सामना संपल्यानंतर सचिनने एक ट्विट करुन, पराभवाबाबतचं मत व्यक्त केलं होतं, त्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विजयाबद्दल न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. तुमचा संघ अप्रतिम होता. भारतीय संघाने त्यांच्या कामगिरीने निराश केले. मी आधीच सांगितले होते की, सहाव्या दिवशीच्या पहिल्या 10 ओव्हर अत्यंत महत्त्वाच्या असून त्या कोहली आणि पुजाराने योग्यरित्या खेळण गरजेचं होतं. पण दोघेही अगदी 10 चेंडूच्या फरकाने बाद झाले. ज्यामुळे संपूर्ण संघ दबावाखाली आला होता.

इतर बातम्या

WTC Final नंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी ‘या’ तीन खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता

“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”

WTC Final मध्ये ‘या’ खेळाडूला खेळवणं भारताची चूक, माजी क्रिकेटपटूने केला मोठा दावा

(Sachin Tendulkar says lack of partnership was one of the reason behind India loss against New Zealand in WTC FInal)

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.