GT vs RR : साई सुदर्शनचा अर्धशतकासह महारेकॉर्ड, आयपीएलमध्ये असं करणारा ठरला पहिलाच भारतीय
Sai Sudharsan Milestone : साई सुदर्शन याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक करताच इतिहास घडवला. साईने या अर्धशतकी खेळीसह महारेकॉर्ड केला.

गुजरात टायटन्सचा युवा आणि सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन याने आयपीएल स्पर्धेत इतिहास घडवला आहे. साईने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 82 धावांची खेळी केली. साईने यासह महारेकॉर्ड केला आहे. साई आयपीएल स्पर्धेत एकाच मैदानात सलग 5 अर्धशतकं करणारा पहिला भारतीय तर एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे. साईने याबाबतीत एबी डी व्हीलियर्सयाच्या विक्रमाची बरोबरी केली.
साईने गुजरातच्या डावातील 10 व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. साईने 32 चेंडूत 155.25 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा केल्या. साईच्या या खेळीत 5 चौकार आणि 2 षटाकारांचा समावेश होता. साईच्या आयपीएल कारकीर्दीतील हे एकूण नववं अर्धशतक ठरलं. तसेच साईचं या 18 व्या मोसमातील नरेंद्र मोदी स्टेडियममधील तिसरं तर एकूण सलग 5 अर्धशतक ठरलं. साईने गेल्या हंगामातील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये अर्धशतकं केली होती. साईआधी कोणत्याही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
तसेच साईआधी एबी डीव्हीलयर्स याने 2018-2019 या दरम्यान एकाच मैदानात सलग 5 अर्धशतकं लगावली होती. एबीने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर आता साईने या महारेकॉर्डची बरोबरी केली आहे.
दरम्यान साईला या सामन्यात शतक करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र साई शतकापासून 18 धावांनी दूर राहिला. साईने 53 चेंडूत 154.172 च्या स्ट्राईक रेटने 82 धावा केल्या. साईच्या या खेळीत 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता.
साई सुदर्शनचा महारेकॉर्ड
𝑼𝑵𝑹𝑬𝑨𝑳 𝑪𝑶𝑵𝑺𝑰𝑺𝑻𝑬𝑵𝑪𝒀!🤯🔥
Sai Sudharsan joins an elite club alongside AB de Villiers becoming only the second batter in IPL history to score five consecutive 50+ scores at a venue! 👏 pic.twitter.com/Xmwy6xgi5R
— CricketGully (@thecricketgully) April 9, 2025
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुधारसन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.