धोनीचा स्टेडियमबाहेर उत्तुंग षटकार पाहून साक्षी-झिवाचा जल्लोष, पाहा धोनीची खास ‘Family Moment’

यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत अव्वल असणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ हैद्राबादवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या षटकात 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना एमएस धोनीने त्याच्या स्टाईलमध्ये उत्तुंग असा षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

धोनीचा स्टेडियमबाहेर उत्तुंग षटकार पाहून साक्षी-झिवाचा जल्लोष, पाहा धोनीची खास 'Family Moment'
MS Dhoni
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 10:48 AM

IPL 2021 : यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत अव्वल असणारा चेन्नई सुपरकिंग्स संघ हैद्राबादवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या षटकात 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना एमएस धोनीने त्याच्या स्टाईलमध्ये उत्तुंग असा षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयाप्रमाणे हा षटकार धोनीने ठोकला. चेन्नईने 6 गडी राखून हैद्राबादवर विजय मिळवला आहे. (Sakshi-Ziva Celebrates MS Dhoni’s high six outside the stadium, watch Dhoni’s special ‘Family Moment’)

सामना तसा बऱ्यापैकी चुरशीचा झाला. हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना 134 धावाच केल्या. पण चेन्नईचे सलामीवीर सोडता इतर फलंदाज फेल झाल्याने हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. पण अखेर धोनीच्या षटकाराने सामना चेन्नईने खिशात घातला. हा विजय चेन्नईसाठी फार महत्त्वाचा ठरला. कारण या विजयासोबत त्यांनी 11 पैकी 9 सामने जिंकत 18 गुण खात्यात मिळवले आहेत. ज्यामुळे चेन्नईने पुढील फेरीत अर्थात प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात प्लेऑफच्या फेरीत जाणारा चेन्नई पहिला संघ ठरला आहे. तर दुसरीकडे 11 पैकी 9 सामने पराभूत झाल्यामुळे हैद्राबादचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

दरम्यान, धोनीने दोन चेंडू बाकी असताना षटकार ठोकून त्याच्या स्टाईलमध्ये सामना जिंकला. हा क्षण धोनीच्या तमाम चाहत्यांसाठी खास होताच, मात्र स्टेडियमध्ये दोन खास व्यक्ती होत्या, ज्यांनी हा षटकार पाहून मोठा जल्लोष केला, या दोन व्यक्ती म्हणजे धोनीची पत्नी साक्षी आणि त्याची कन्या झिवा. त्यांच्या जल्लोष हीदेखील या सामन्यातील खास मूमेंट होती.

धोनीच्या षटकारानंतर साक्षीचा जल्लोष

चेन्नई सुपर किंग्ज संघाला शेवटच्या तीन चेंडूंमध्ये दोन धावांची गरज होती. शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून धोनीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विजयादरम्यान संपूर्ण स्टेडियमचे वातावरण पाहण्यासारखे होते. विशेषत: त्याची पत्नी साक्षी धोनी आणि झिवा धोनीची प्रतिक्रिया. धोनीने विजयी षटकार फटकावताच साक्षी उभी राहिली आणि टाळ्या वाजवू लागली. तिच्यासोबत उभ्या असलेल्या झिवालादेखील तिच्या वडिलांना पाहून खूप आनंद झाला होता. ती तिच्या आईसोबत षटकार आणि सामन्यातील विजय साजरा करताना दिसली. साक्षी आणि झिवा गेल्या वर्षी आयपीएलदरम्यान, धोनीसोबत यूएईला गेल्या नव्हत्या. यावेळी मात्र त्या दोघी संघासह तेथे उपस्थित आहेत.

इतर बातम्या

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

T20 World cup संघात ‘या’ खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल

(Sakshi-Ziva Celebrates MS Dhoni’s high six outside the stadium, watch Dhoni’s special ‘Family Moment’)

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.