पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची भिंत म्हणवल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारावर सध्या त्याच्या बॅटिंग परफॉर्मन्समुळे सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. अनेक टीकाकारांच्या तो सध्या निशाण्यावर आहे.
India vs England : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघाची भिंत म्हणवल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारावर (Cheteshwar Pujara) सध्या त्याच्या बॅटिंग परफॉर्मन्समुळे सगळीकडून टीकेची झोड उठली आहे. अनेक टीकाकारांच्या तो सध्या निशाण्यावर आहे. त्याची बॅट गेल्या कित्येक महिन्यांपासून बोलत नाहीय. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीयत… त्याचा बिघडलेला फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हा तोच पुजारा आहे का, ज्याला भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखलं जायचं?, असा प्रश्न क्रिकेट रसिकांना अनेक वेळा पडतोय. इंग्लंड दौऱ्यात त्याने खेळलेल्या तीन डावांत 4 रन्स, नाबाद 12 रन्स आणि 9 रन्स अशी त्याची कामगिरी राहिलीय. यापेक्षा भयानक आहे की सातत्याने तो एकाच पद्धतीने आऊट होतोय. अशा सगळ्या परिस्थितीत त्याच्या संघातल्या जागेविषयी आता चर्चा सुरु झालीय. त्याला पर्याय कोण, त्याची जागा कोण घेऊ शकतो?, अशा प्रकारची चाचपणीही सुरु झालीय.
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) याने देखील पुजाराच्या ढासळलेल्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केलीय. तसंच भारतीय संघ किंवा विराट कोहलीला जर वाटलं तर त्याने पुजाराच्या जागी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी द्यावी, असं सलमान बटने म्हटलं आहे. तसंच विराट कोहली आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकावर हे सगळं अवलंबून असल्याचंही त्याने आवर्जून सांगितलं.
पुजाराला आणखी एक कसोटी खेळण्याची संधी द्यावी
पुजाराला संघाबाहेर ठेवणं घाईचं होईल. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंत 3 डाव खेळले आहेत. पुजारा अनुभवसंपन्न खेळाडू आहे. त्याने याआधी भारताला अनेक रोमहर्षक सामने जिंकवून दिलेत. कठीण काळात त्याने भारताला सावरलं आहे. सध्या त्याचा बॅटिंग परफॉर्मन्स ठीक होत नाहीय. पण त्याला आणखी एक संधी द्यायला हरकत नाही, असंही सलमान बटने म्हटलं आहे.
सूर्यकुमार नुकताच संघात सामील
श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात सूर्यकुमार भारतीय संघाचा भाग होता. पण सलामीवीर शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना इंग्लंडमध्ये दुखापत झाल्यानंतर बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी शनिवारी त्यांचा क्वारन्टाईन पिरियड संपवला.
(Salman Butt Says Indian Cricket Team And virat kohli Can try Suryakumar yadav Place of the Wall Cheteshwar pujara)
हे ही वाचा :
Ind vs Eng : 13 नो बॉल, 15 मिनिटांची एक ओव्हर, क्रिकेटच्या पंढरीमध्ये बुमराहची लाजीरवाणी कामगिरी