IPL: बलात्काराचा आरोप असलेल्या आयपीएलमधील क्रिकेटरला अखेर मिळाला जामीन

संदीप कॅरेबियाई प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना, एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. न्यायालयाने इंटरनॅशनल क्रिकेट टीमचा कॅप्टन संदीप लामिछानेच्या अटकेच वॉरंट जारी केलं होतं.

IPL: बलात्काराचा आरोप असलेल्या आयपीएलमधील क्रिकेटरला अखेर मिळाला जामीन
sandeep lamichhaneImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 12:07 PM

Sandeep Lamichhane Rape Case​: नेपाळचा स्टार क्रिकेटर आणि माजी कॅप्टन संदीप लामिछानेवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संदीप कॅरेबियाई प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना, एका अल्पवयीन मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. नेपाळच्या न्यायालयाने आता बलात्काराचा आरोप असलेल्या संदीप लामिछानेची जामिनावर सुटका केली आहे.

कधी झाली होती अटक?

8 सप्टेंबर 2022 रोजी नेपाळच्या न्यायालयाने इंटरनॅशनल क्रिकेट टीमचा कॅप्टन संदीप लामिछानेच्या अटकेच वॉरंट जारी केलं होतं. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. काठमांडू येथील हॉटेलच्या खोलीत बलात्कार केल्याचा आरोप आहे. पाटन उच्च न्यायालयाने 20 लाख रुपयाच्या जात मुचलक्यावर लामिछानेची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. लामिछानेला ऑक्टोबर महिन्यात अटक करण्यात आली होती.

3 महिने होता तुरुंगात

न्यायाधीश ध्रुवराज नंदा आणि रमेश धाकल यांच्या संयुक्त पीठाने पूर्व आयपीएल प्लेयर लामिछानेची 20 लाख रुपयाच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांनी काठमांडू जिल्हा न्यायालयाचा आदेश पलटला. पीडित अल्पवयीन मुलीने पाच सप्टेंबरला पोलीस ठाण्यात संदीप लामिछानेविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. तिने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर लामिछानेला जिल्हा न्यायालयाच्या आदेशावर तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये कुठल्या टीमकडून खेळला?

“चौकशीच्या प्रत्येक टप्प्यात पूर्ण सहकार्य करीन. स्वत:ला निर्दोष ठरवण्यासाठी कायदेशीर लढाई लढेन” असं लामिछानने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं. संदीप लामिछानेला अटक झाली. अंतिम आदेश येईपर्यंत संदीप लामिछानेला देशाबाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. लेग स्पिनर संदीप लामिछाने नेपाळचा सर्वात मोठा हाफ प्रोफाइल क्रिकेटर आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा तो पहिला क्रिकेटर आहे. 2018 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून डेब्यु केला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.