Sania Mirza : एवढ्या वादानंतर जवळ आलेले, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक एकमेकांपासून दूर जाण्याच्या वाटेवर?
सानिया हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत जणू यावर शिक्कामोर्तब केले.
मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे सध्या चर्चेत आहेत. सानिया आणि शोएब यांच्यामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामध्येच सानिया हिने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत जणू यावर शिक्कामोर्तब केले. सानियाने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, तुटलेले दिल नेमके जातात कुठे? सानिया मिर्झाच्या या पोस्टवरून अनेक चर्चांना उधाण आलंय.
View this post on Instagram
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी हैद्राबाद येथे 2010 मध्ये लग्न केले. सानियाने एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्याने त्यावेळी तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. इतकेच नव्हे तर अनेक मुलाखतीमध्ये सानियाला हा प्रश्न विचारण्यात आला होता की, भारत आणि पाकिस्तान मॅच असेल त्यामध्ये शोएब मलिक खेळत असेल तर भारत जिंकावा वाटेल की, पाकिस्तान…
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या नात्यात काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार हे दोघे लवकरच विभक्त होणार असल्याचे कळते असून हे घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत, अशी एक चर्चा सुरू आहे. मात्र, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या नात्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे दरी निर्माण झाली हे कळू शकले नाहीये.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी शोएब मलिकने आपल्या लेकाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, सानिया मिर्झाने एकही फोटो शेअर केला नाही. नुकताच सानियाने सोशल मीडियावर आपल्या लेकासोबत एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जातात…आता हे सानियाने नेमके कशासाठी लिहिले याची चर्चा सुरू आहे.