FIFA World Cup 2023: कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनचा जलवा
साता समुद्रापार तिथे कतारमध्येही संजू, संजू, संजू.....
दोहा: टीम इंडिया वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या आपल्या फॅन्सच्या निशाण्यावर आहे. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव, काही खेळाडूंच खराब प्रदर्शन ही त्यामागे कारणं आहेत. आता यामध्ये आणखी एका कारणाची भर पडलीय. त्यामुळे कॅप्टनशिप संभाळणारा खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये संजूचे चाहते
संजू सॅमसनला टीम इंडियात पुरेशी संधी मिळत नाहीय, हे फॅन्सच्या नाराजीमागच प्रमुख कारण आहे. त्यामुळे मायदेशातच नाही, परदेशातही संजूला समर्थन मिळतय. कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्येही संजूचे चाहते आहेत.
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम खेळत नाहीय, पण….
कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भले भारतीय टीम खेळत नाहीय. पण भारतीय फुटबॉल चाहते तिथे सामने पाहण्यासाठी गेले आहेत. काही फॅन्सनी भारतीय क्रिकेटपटूंबद्दलच आपलं प्रेमही व्यक्त केलय. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन एमएस धोनीची जर्सी घेऊन एक फॅन ब्राझीलच्या सामन्याला उपस्थित होता. आता संजू सॅमसनच्या चाहत्यांनी त्याच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
कतारमध्ये संजूची चर्चा
संजू सॅमसनच्या चाहत्यांनी त्याच्या फोटोचे काही पोस्टर छापले आहेत. हे पोस्टर्स घेऊन ते कतारच्या स्टेडियममध्ये पोहोचले. फॅन्सचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. राजस्थान रॉयल्सने हे फोटो आपल्या टि्वटर अकाऊंटवर पोस्ट केलेत. संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स टीमच नेतृत्व करतो.
मॅच कुठलीही असो…..
राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमधील सूंजच्या फोटोवर समर्थकांनी एक संदेश लिहिलाय. ‘टीम, मॅच कुठलीही असो, संजूचे फॅन्स त्याच्यासोबत आहेत’
Everybody: Who are you supporting at the FIFA World Cup?
Us: pic.twitter.com/e66NRg78dh
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 27, 2022
काल भारत-न्यूझीलंडमध्ये दुसरा वनडे सामना होता. पावसामुळे ही मॅच रद्द झाली. पण चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला बाहेर बसवलं. त्याच्याजागी दीपक हुड्डाला संधी दिली. धवनच्या या निर्णयावर संजूचे फॅन्स चांगलेच संतापले. त्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला.“संजूच करिअर संपवायच असं टीम मॅनेजमेंटने ठरवलेलं दिसतय” असं एका युजरने लिहिलं होतं.