सारा तेंडुलकर या श्रीमंत युवा उद्योजकाला करतेय डेट? फोटो झाले व्हायरल
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचे नाव काही दिवसांपूर्वी शुभमन गिलसोबत जोडले गेले होते. दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. पण आता साराचे नाव एका उद्योगपतीसोबत जोडले जात आहे. कोण आहे तो उद्योगपी जाणून घ्या.
सारा तेंडुलकर कुठली स्टार नसली तरी तिची चर्चा सोशल मीडियावर होत असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते. ज्यामुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने ती तिची वेगळी ओळख आहे. पण सारा तेंडुलकर आता ब्रँडिंगमधूनही चांगली कमाई करत आहे. काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल यांच्यासोबत जोडले गेले होते. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचे ब्रेकअपच्या बातम्याही समोरआल्या होत्या.
भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या डेटींगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर सारा तेंडुलकर आणि गोव्याचा मोठा उद्योगपती सिद्धार्थ केरकर यांचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्याच्या आधारे सारा आणि गिलमध्ये ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच, गिल आणि साराचे प्रकरण कधीही दोघांनी स्वीकारलेले नाही.
View this post on Instagram
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी अद्याप दोघेही एकमेकांना डेट करत आहेत की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अनेक रिपोर्ट्समध्ये हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा दावा करण्यात आला होता. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत.
सारा तेंडुलकरचे नाव आता उद्योगपती सिद्धार्थ केरकर सोबत जोडले जात आहे. पण त्याआधी तिचे नाव हिमांश कोहली सोबत देखील जोडले गेले होते. सारा तेंडुलकरचे आणि त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती पुढे आली.