Video : मुंबईकरांचा उत्साह पाहून रोहित शर्माही झाला बेभान, गर्दीत उतरून ढोलताशांवर धरला ठेका

टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर प्रत्येक भारतीयांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कदाचित टीम इंडिया बारबाडोसमध्ये याची उणीव जाणवली असेल. पण टीम इंडिया भारतात येताच सर्व भरून काढलं आहे. मुंबईत तर टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी रोहित शर्माही बेभान झाला आणि गर्दीत उतरून डान्स केला.

Video : मुंबईकरांचा उत्साह पाहून रोहित शर्माही झाला बेभान, गर्दीत उतरून ढोलताशांवर धरला ठेका
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 10:00 PM

भारत हा क्रिकेटवेडा देश आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. क्रिकेटची चर्चा सर्वत्र होत असते. मग ती ट्रेन असो, मैदान असो की आणखी काही..घरात सर्वच जण आवडीने क्रिकेट पाहात असतात. त्यामुळे लहानपणापासूनच क्रिकेट बाळकडू मिळतं. त्यामुळे क्रिकेट आणि भारतीयांचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे आयसीसी चषक जिंकला तर आनंद तर होणारच..दिल्ली असो की मुंबई सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष होत आहे. टीम इंडियाचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मरीन ड्राईव्हवर निघालेल्या ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढली. यावेळी इतका सारा जनसमुदाय पाहून क्रिकेटपटूही भारावून गेले. काही खेळाडूंना तर या वेडेपणाची अनुभूती पहिल्यांदाच आली असावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांनी टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती. हा सर्व जल्लोष पाहून क्रिकेटपटूही भारावून गेले. रोहित शर्मालाही स्वत:ला आवरणं कठीण झालं. रोहित शर्मा चाहत्यांच्या गराड्यात गेला आणि ढोलताशांच्या ठेक्यावर ताल धरला. त्याच्या या कृतीमुळे क्रीडारसिक खूश झाले

वानखेडे मैदानावर पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा डान्स सुरुच होता. सर्वच खेळाडू नाचताना दिसले. मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा या सर्वांनीच डान्स केला. ही दृष्य पाहून प्रत्येक भारतीय भारावून गेला. 2007 साली अशीच अनुभूती आली होती. मरीन ड्राईव्हसवरून वानखेडे स्टेडियमवर विजयी रॅली काढण्यात आली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात विजय मिळवून पुन्हा तीच अनुभूती आली. मुंबईत सर्वत्र आनंदोत्सव पाहायला मिळाला.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. आता या पुढे हे तीन दिग्गज खेळाडू टी20 आंतरराष्ट्रीय खेळताना दिसणार नाहीत. पुढच्या वर्षी होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत मात्र हे खेळाडू खेळतील. वनडे संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असेल. ही स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान हा सामना 1 मार्चला होणार आहे.

Non Stop LIVE Update
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.
लाडकी बहीण योजनेचा 'या' महिलांना देखील लाभ, फडणवीसांनी केलं स्पष्ट
लाडकी बहीण योजनेचा 'या' महिलांना देखील लाभ, फडणवीसांनी केलं स्पष्ट.
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून 24 तास...
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून 24 तास....
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट
सोमय्यांचा हातोडा त्यांच्याच पायावर, आरोपांनंतर वायकरांना क्लिनचीट.
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?
जरांगेंचा अल्टिमेटम अन काय करणार सरकार? सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार?.
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय
शिवसेना,राष्ट्रवादीवर सुप्रीम फैसला, विधानसभेच्या आधी काय येणार निर्णय.
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.