‘पाकिस्तानचा पराभव माझ्या जावयामुळे,’ शाहीद आफ्रिदीने शाहीनला ठरवलं जबाबदार, म्हणतो यॉर्कर टाकायची अक्कल नाही!

सेमीफायनच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात देत विजय मिळवला आहे. यावेळी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीची एक ओव्हर पाकला अत्यंत महाग पडली आहे.

'पाकिस्तानचा पराभव माझ्या जावयामुळे,' शाहीद आफ्रिदीने शाहीनला ठरवलं जबाबदार, म्हणतो यॉर्कर टाकायची अक्कल नाही!
शाहीन आणि शाहीद आफ्रिदी
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 7:04 AM

दुबई : सेमीफायनलसारख्या (Semi final between Pakistan vs Australia) अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. अगदी हाता-तोंडाशी आलेला सामना पाकिस्तानने गमावला आहे. विशेष म्हणजे या पराभवात एक षटक पाकिस्तानला महाग पडलं आहे. हे षटकं म्हणजे पाकिस्तानकडून टाकण्यात आलेलं 19 वं षटक. जे त्यांचा ‘स्टार’ गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) टाकलं. शाहीनने या एका षटकात तब्बल 22 धावा देत सामना गमावला. पण याचवेळी तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हसन अलीच्या हस्ते झेलबाद झाला असता. पण त्याच्या हातून हा झेल सुटला. ज्यामुळे अनेकांनी हसनलाही पराभवाचा जबाबदार ठरवलं. पण पाकचा माजी खेळाडू शाहीदने त्याचं मत स्पष्ट करत शाहीनलाच पराभवास कारणीभूत ठरवलं आहे.

सामन्यात पाकिस्तान एकावेळी अत्यंत मजबूत स्थितीत होता. 177 धावांचे मोठे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर असताना 100 धावा होण्यापूर्वीच त्यांचे 5 गडी बाद झाले होते. पण त्यावेळी क्रिजवर आलेल्या मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉयनिसने दमदार फलंदाजी केली. मॅथ्यूनेच महत्त्वपूर्ण असे 3 षटकार खेचले. दरम्यान हे षटकार शाहीनच्या ओव्हरमध्ये आल्याने विश्वचषकातील हिरो एका ओव्हरमध्ये झिरो झाला.

शाहिद आफ्रिदीने शाहीनला सुनवलं

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या पराभवामागे हसन अलीने कॅच सोडली हे कारण नसून त्याचा होणारा जावई शाहीनची ओव्हर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शाहीद म्हणाला, ‘हसनने कॅच सोडली, त्यानंतर 3 लागोपाठ षटकार खाणं काही बरोबर गोष्ट नाही. मी शाहीनपासून अजिबात खूश नाही. त्याच्याकडे इतका वेग असताना त्याला यॉर्कर टाकण्याची साधी अक्कल हवी होती.’ शाहीन हा शाहीदच्या अक्शा या मुलीचा होणारा नवरा आहे. शाहीदला 5 मुली असून अक्शा 20 वर्षाची आहे.

हे ही वाचा

Special Report: ‘विराटपर्व’ संपण्याच्या वाटेवर?

सानिया मिर्झाने पाकिस्तानला पाठिंबा देताच भारतीय नाराज, म्हणाले ‘पाकिस्तानातच जाऊन राहा…’

IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण

(Shaheen afridi should not have conceded three sixes in semi final says shahid afridi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.