Amit Mishra-Shahid Afridi: यासीन मलिकला सपोर्ट करणाऱ्या शाहिद आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद

यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात NIA कोर्टाने दोषी ठरवलं. यासीन मलिकला शिक्षा ठोठावण्याआधी शाहीद आफ्रिदी आणि अन्य पाकिस्तानी नेत्यांनी मोदी सरकार आणि भारताविरोधात वक्तव्य केली.

Amit Mishra-Shahid Afridi: यासीन मलिकला सपोर्ट करणाऱ्या शाहिद आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद
Amit Mishra-Shahid Afridi
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 7:42 PM

मुंबई: यासीन मलिकला शिक्षा ठोठावणार त्यावरुन भारतविरोधी टि्वट करणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने (Amit Mishra) सडेतोड उत्तर दिलं आहे. क्रिकेटमधुन निवृत्ती घेतली असली, शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) नेहमीच चर्चेत असतो. आफ्रिदीने अलीकडच्या काही वर्षात सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतली आहे. काश्मीर मुद्यावरुन सातत्याने त्याने भारत विरोधी वक्तव्य केली आहेत. आता बंदी घातलेली संघटना JKLF चा प्रमुख यासीन मलिकला शिक्षा होण्याआधी शाहिद आफ्रिदीला मिर्च्या झोंबल्या. आफ्रिदीने यासीन मलिकला शिक्षा ठोठावण्याआधी भारतविरोधी वक्तव्य केलं.

यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात NIA कोर्टाने दोषी ठरवलं आहे. यासीन मलिकला शिक्षा ठोठावण्याआधी शाहीद आफ्रिदी आणि अन्य पाकिस्तानी नेत्यांनी मोदी सरकार आणि भारताविरोधात वक्तव्य केली आहेत. टि्वटस केली आहेत.

शाहिद आफ्रिदीने काय टि्वट केलं

“भारत नेहमीप्रमाणे मानवाधिकार उल्लंघनाविरोधात उठणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे हे प्रयत्न निरर्थक आहेत. यासीन मलिकवर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. त्याने काश्मीरचा स्वातंत्र्य संघर्ष थांबणार नाही. मी संयुक्त राष्ट्राला विनंती करतो की, त्यांनी काश्मिरी नेत्यांविरोधात सुरु असलेल्या या बेकायद, अन्यायकारक गोष्टींची दखल घ्यावी” असं शाहिद आफ्रिदीने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

अमित मिश्राचं सडेतोड प्रत्युत्तर

आफ्रिदीच्या या टि्वटला अमित मिश्राने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “प्रिय शाहिद आफ्रिदी त्याने कोर्ट रुममध्ये स्वत: दोषी असल्याचं मान्य केलं आहे. तुझ्या जन्मतारखे प्रमाणे सर्व दिशाभूल करणारे असू शकत नाही” असं अमित मिश्राने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आफ्रिदीच्या वयाचा वाद काय आहे?

शाहिद आफ्रिदी आपल्या वयामुळे वादात सापडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार, आफ्रिदीचा जन्म 1 मार्च 1980 रोजी झाला होता. म्हणजे त्याचं वय 42 आहे. वर्ष 2019 मध्ये आफ्रिदीने खुलासा केला की, 1996 साली नैरोबीमध्ये श्रीलंकेविरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकलं. त्यावेळी तो 16 वर्षांचा नव्हता. शाहिद आफ्रिदीने त्याची आत्मकथा गेमचेंजरमध्ये त्याचं वय फक्त 19 असल्याचं लिहिलं आहे. माझा जन्म 1975 मध्ये झाला. पण अधिकाऱ्यांनी वय लिहिण्यात चूक केली, असं आफ्रिदीने सांगितलं होतं.

यासीन मलिकला जन्मठेप

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या टेरर फंडिग प्रकरणात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिग प्रखरणात दोषी आढळलेला JKLF प्रमुख यासिन मलिकला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. यासिन मलिकला कलम 120 नुसार 10 वर्षे कारावास आणि कलम 121 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासिनची रवानगी आता तिहार जेलमध्ये होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.