लाज वाटली पाहिजे, मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी खेळाडूला असा झापला

World Cup 2023 : पाकिस्तानच्या माजी खेळाडूला भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने चांगलेच फटकारले आहे. शमीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तो पाकिस्तानच्या खेळाडूची लाज काढत आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

लाज वाटली पाहिजे, मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी खेळाडूला असा झापला
Shami on hasan raza
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 4:21 PM

Shami on hasan raza : भारतीय खेळाडू वर्ल्डकप 2023 मध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने भारतीय गोलंदाजांना वेगळे चेंडू दिले जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी इतर असल्याचा आरोप त्याने केला होता. भारतीय गोलंदाज सध्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्या जोरावर भारताने आठही सामने जिंकले आहेत. यावर हसन रझा म्हणाला होता की, भारतीय गोलंदाजांना खास चेंडू दिले जात आहेत त्यामुळे त्यांची कामगिरी अप्रतिम आहे.

माजी पाकिस्तानी खेळाडूच्या या विधानावर टीका होत असताना आता माजी दिग्गज पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमनेही हसन रझा यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते. यावर आता भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने देखील हसन रझा याला उत्तर दिले आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला चांगलेच झापले आहे. शमीने लिहिले, “लाज वाटली, यार, खेळावर लक्ष केंद्रित कर आणि मूर्खपणावर नाही… कधीतरी इतरांच्या यशाचा आनंद घ्या. शिट यार, हा आयसीसी विश्वचषक आहे, तुझी स्थानिक स्पर्धा नाही. तू खेळाडू होतास? वसीम भाई. तेव्हाही मी समजावले होते… हाहाहाहा… तुझावर वसीम अक्रमचाही विश्वास नाही.”

शमीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या विश्वचषकात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि 4 सामन्यात 16 विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. शमी विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. शमीने आतापर्यंत विश्वचषकात भारताकडून एकूण 47 विकेट्स घेतल्या आहेत.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.