Shane Warne Death: नियती ! शेन वॉर्नच्या शेवटच्या ट्विटचीही का होतेय चर्चा? का म्हणाला RIP Mate !
ऑस्ट्रेलियाचे महान लेगस्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांच्या अकाली एक्झिटने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्न यांचं अचानक जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं आहे.
सिडनी: ऑस्ट्रेलियाचे महान लेगस्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांच्या अकाली एक्झिटने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्न यांचं अचानक जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. काल ऑस्ट्रेलियाने एकाच दिवसात आपल्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना गमावलं. शेन वॉर्न यांनी त्यांचं निधन होण्याच्या 13 तास आधी एक टि्वट केलं होतं. ते शेवटचं टि्वट ठरलं. शेन वॉर्न याने त्या टि्वटमधून रॉड मार्श (Rod marsh) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. 24 तासांच्या आत ऑस्ट्रेलियाने आपल्या या दोन महान क्रिकेटपटूंना गमावलं. हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) रॉड मार्श यांना क्वीन्सलँडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते कोमाममध्ये होते. रॉयल एडलेड हॉस्पिटलमध्ये मार्श यांनी अखेरचा श्वास घेतला. शेन वॉर्न थायलंडच्या एका व्हिलामध्ये मृतावस्थेत आढळला. डॉक्टरांनी तसेच वॉर्न सोबत असलेल्या मित्रांनी सीपीआर देऊन त्याचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही.
ते शेवटचं टि्वट काय होतं?
“रॉड मार्श यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झालं. क्रिकेटमधले ते एक महान खेळाडू होते. अनेत तरुण मुला-मुलींसाठी ते प्रेरणास्त्रोत होते. रॉड यांना क्रिकेटची खूप काळजी होती. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसाठी त्यांनी बरच काही केलय. रॉड आणि त्यांच्या कुटुंबाला माझ्याकडून भरपूर सारं प्रेम. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ”
Sad to hear the news that Rod Marsh has passed. He was a legend of our great game & an inspiration to so many young boys & girls. Rod cared deeply about cricket & gave so much-especially to Australia & England players. Sending lots & lots of love to Ros & the family. RIP mate❤️
— Shane Warne (@ShaneWarne) March 4, 2022
शेन वॉर्नने गुरुवारी संध्याकाळी थायलंडमधल्या व्हिलामधून हे टि्वट केलं होतं. वॉर्नला मागच्यावर्षी कोविडची लागण झाली होती. वॉर्नने त्याच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जुलै 2022 पर्यंत फिट होण्याचे लक्ष्य ठेवले होते.