Shane Warne Death: शेन वॉर्नच्या खोलीत पोलिसांना आढळले रक्ताचे डाग, थायलंडला जाण्याआधी डॉक्टरांना का भेटलेला वॉर्न?

Shane Warne Death: ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं दोन दिवसांपूर्वी थायलंडमधील एका व्हिलामध्ये निधन झालं. तो 52 वर्षांचा होता. शेन वॉर्नच्या (Shane Warne) मृत्यू संदर्भात आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

Shane Warne Death: शेन वॉर्नच्या खोलीत पोलिसांना आढळले रक्ताचे डाग, थायलंडला जाण्याआधी डॉक्टरांना का भेटलेला वॉर्न?
अखेरच्या क्षणी शेन वॉर्न सोबत त्याचे मित्र होते. सर्वप्रथम वॉर्नच्या मित्रानेच त्याला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं. दुपारच्या जेवणासाठी म्हणून तो शेन वॉर्नला बोलवायला त्याच्या रुममध्ये गेला होता. अनेक हाका मारुनही शेन वॉर्न काहीच प्रतिसाद देत नव्हता. Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 2:17 PM

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं दोन दिवसांपूर्वी थायलंडमधील एका व्हिलामध्ये निधन झालं. तो 52 वर्षांचा होता. शेन वॉर्नच्या (Shane Warne) मृत्यू संदर्भात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. थायलंडला जाण्याआधी शेन वॉर्नच्या छातीत वेदना होतं होत्या. त्यानंतर त्याने डॉक्टरांशी सुद्धा सल्लामसलत केली होती. थायलंड पोलिसांनी (Thailand Police) ही माहिती दिली आहे. चार मार्चला शेन वॉर्नचं कोह समुई येथे निधन झालं. ह्दयविकाराच्या झटक्यामुळे (Shane Warne Heart Attack) शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. शेन वॉर्नला दम्याचा आजार होता. त्याशिवाय ह्दयविकारासंबंधी त्याने डॉक्टरांशी सुद्धा चर्चा केली होती, अशी माहिती थायलंडचे पोलीस अधिकारी युत्ताना सिरीसोम्बात यांनी दिली. वॉर्नच्या कुटुंबियांनी थायलंड पोलिसांना ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियात असतानाच शेन वॉर्नच्या छातीत वेदना होतं होत्या. शेन वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग सुद्धा आढळले आहेत. हे रक्त शेन वॉर्नचच आहे. कारण सीपीआर ट्रीटमेंट देत असतानाच त्याच्या तोंडातून हे रक्त पडलं होतं. शेन वॉर्नच्या मृत्यू संशयास्पद नसल्याचं थायलंड पोलिसांचं मत आहे.

कुठलं रक्त होतं ते?

शेन वॉर्न त्याच्या तीन मित्रांसोबत तीन महिने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थायलंडच्या कोह समुई बेटावर गेला होता. तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. वॉर्नचा मित्र त्याला जेवण्यासाठी म्हणून बोलवायला गेला, त्यावेळी तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्रांनीच लगेच त्याला सीपीआर ट्रीटमेंट दिली. पण वॉर्नला वाचवता आलं नाही. प्रॉविंशियल पोलिसांचे कमांडर सतित पॉल्पिनित यांनी वॉर्नच्या खोलीत रक्ताचे डाग आढळल्याचं सांगितलं.

सीपीआर देताना वॉर्नच्या तोंडातून लिक्विडसोबत रक्तही बाहेर आलं. skynews.com.au ने हे वृत्त दिलं आहे. शेन वॉर्नच्या रुममध्ये बरच रक्त होतं. सीपीआर सुरु केल्यानंतर रक्तासोबत बरंच लिक्विडही बाहेर आलं.

मित्रानेच जमिनीवर पडलेलं पाहिलं

अखेरच्या क्षणी शेन वॉर्न सोबत त्याचे मित्र होते. सर्वप्रथम वॉर्नच्या मित्रानेच त्याला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं. दुपारच्या जेवणासाठी म्हणून तो शेन वॉर्नला बोलवायला त्याच्या रुममध्ये गेला होता. अनेक हाका मारुनही शेन वॉर्न काहीच प्रतिसाद देत नव्हता. “आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी आम्ही शेन वॉर्नला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं” असं रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितलं. शेन वॉर्नच्या मित्राने त्याला सीपीआर देऊन त्याचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न केला. आम्ही थाय इंटरनॅशनल हॉस्पिटलकडेही मदत मागितली, असे शेन वॉर्नसोबत असलेल्या मित्राने सांगितले. सेवन न्यूज डॉट. कॉमने हे वृत्त दिलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.