IND vs AUS Test : अश्विन नाही, भारताचा ‘तो’ गोलंदाज जास्त धोकादायक, शेन वॉटसनने दिला इशारा

IND vs AUS Test : भारतीय स्पिनर्सचा सामना करणं आव्हानात्मक असेल, याची ऑस्ट्रेलियन टीमला कल्पना आहे. त्यासाठी ते विशेष तयारी सुद्धा करतायत. ऑस्ट्रेलियाच्या तयारीवर नजर टाकली किंवा त्यांची वक्तव्य पाहिली, तर त्यांनी अश्विनचा धसका घेतल्याच दिसतय.

IND vs AUS Test : अश्विन नाही, भारताचा 'तो' गोलंदाज जास्त धोकादायक, शेन वॉटसनने दिला इशारा
R.Ashwin
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 9:57 AM

IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची सीरीज होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये टेस्ट सीरीज सुरु होईल. भारतीय स्पिनर्सचा सामना करणं आव्हानात्मक असेल, याची ऑस्ट्रेलियन टीमला कल्पना आहे. त्यासाठी ते विशेष तयारी सुद्धा करतायत. ऑस्ट्रेलियाच्या तयारीवर नजर टाकली किंवा त्यांची वक्तव्य पाहिली, तर त्यांनी अश्विनचा धसका घेतल्याच दिसतय. ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंड शेन वॉटसनने आपल्या टीमला एका खेळाडूपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. वॉटसनच्या मते, अश्विनपेक्षा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजा जास्त धोकादायक ठरु शकतो.

अश्विनपेक्षा तो जास्त धोकादायक

ऑस्ट्रेलियाने आपल्या सराव सत्रात अश्विनसारखी गोलंदाजी करणाऱ्या महेश पिथियाचा समावेश केलाय. त्याची गोलंदाजी Action अश्विनसारखी आहे. त्याच बळावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अश्विनच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करण्याची व्यूहरचना आहे. अश्विनपेक्षा जाडेजा जास्त धोकादायक आहे, असं वॉटसन याला वाटतं.

वॉटसनने सांगितलं जाडेजाच्या गोलंदाजीच वैशिष्ट्य

“जाडेजा चेंडू वेगात टाकतो आणि फ्लॅट ठेवतो. त्याशिवाय त्याच्या गोलंदाजीत अचूकता आहे. त्यामुळे तो जास्त धोकादायक आहे” असं वॉटसन म्हणाला. “विकेटवर चेंडू टर्न होऊ लागल्यानंतर जाडेजाची गोलंदाजी खेळणं जास्त कठीण आहे. चेंडू टर्न होऊ लागल्यानंतर तो वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज आहे. कारण तो फ्लॅट गोलंदाजी करतो. वेगात चेंडू टाकतो. अचूक लाइन-लेंग्थ असते. स्टम्पवर गोलंदाजी करतो. जाडेजाला खेळताना फक्त टिकून राहणच नाही, तर धावा बनवणं सुद्धा कठीण असतं” असं शेन वॉटसन म्हणाला. बॅट्समनना खास सल्ला

भारतात कशी बॅटिंग करायची, त्या बद्दल शेन वॉटसनने ऑस्ट्रेलियन टीमला खास सल्ला दिला. “भारतात सरळ बॅटने खेळणं गरजेच आहे. बॅकफुटवर जाऊन लेग साइड किंवा ऑफ साइडला खेळा. यात धोका कमी असतो. चांगले खेळाडू भारतात क्रॉस बॅटचा फार कमी वापर करतात. सरळ बॅटने खेळून लेग साइडला धावा बनवतात” असं शेन वॉटसन म्हणाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.