प्रेयसीसोबत अनेक वर्षांची ‘पार्टनरशिप’, मुंबईकर ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरचा साखरपुडा

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत एंगेजमेंट केली आहे. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

प्रेयसीसोबत अनेक वर्षांची 'पार्टनरशिप', मुंबईकर 'लॉर्ड' शार्दुल ठाकूरचा साखरपुडा
Shardul Thakur Engagement
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 3:40 PM

Shardul Thakur Engagement: भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत एंगेजमेंट केली आहे. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रांगणात पार पडलेल्या एका साध्या सोहळ्यात हा साखरपुडा पार पडला. (Shardul Thakur gets engaged with his girlfriend Mittali Parulkar after longtime relationship)

या समारंभासाठी केवळ 75 लोकांना आमंत्रित केले होते, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि दोघांचेही मित्र उपस्थित होते. एंगेजमेंटनंतर जवळपास एक वर्षानंतर शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकर लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघेही लग्नबंधनात अडकू शकतात.

नुकत्याच यूएईत पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर शार्दुल ठाकूर टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता. तो सध्या ब्रेकवर आहे. त्याने आतापर्यंत चार कसोटी, 15 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तो नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. अलीकडच्या काळात शार्दुल तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत आहे. कसोटीत त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याने अर्धशतके झळकावली होती.

शार्दुलची कारकीर्द

शार्दुल ठाकूर हा मूळचा मुंबईजवळच्या पालघर या उपनगरातला रहिवासी आहे. 2017 मध्ये त्याने टीम इंडियामध्ये पदार्पण केले. तर 2018 मध्ये त्याचे कसोटी पदार्पण झाले. त्याने आतापर्यंत कसोटीत 14, वनडेत 22 आणि टी-20 मध्ये 31 बळी घेतले आहेत. शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा यांनी एकत्र अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोघांनीही खेळातील बारकावे एकच प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून शिकून घेतले आहेत. शालेय जीवनात त्याने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला होता.

पुढे मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्याने टीम इंडियात स्थान मिळवले. मुंबईला रणजी चॅम्पियन बनवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आयपीएलमध्ये त्याचे पदार्पण पंजाब किंग्जकडून झाले होते. पण नंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये येऊन त्याला यश मिळाले. 2018 आणि 2021 आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई संघाचा तो भाग होता. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

IND vs NZ : टीम इंडिया धर्मसंकटात, विराट कोहलीसाठी कोणता फलंदाज बलिदान देणार?

‘माझी भारतीय संघात निवड करु नका’; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती

ख्रिस गेल घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणार? ‘युनिव्हर्स बॉस’कडून निवृत्तीचे संकेत

(Shardul Thakur gets engaged with his girlfriend Mittali Parulkar after longtime relationship)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.