मोठी बातमी! T20 World Cup साठी भारतीय संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री, ‘या’ खेळाडूची घेणार जागा

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये पार पडणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने संघ कधीच जाहीर केला होता. पण आता य संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

मोठी बातमी! T20 World Cup साठी भारतीय संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री, 'या' खेळाडूची घेणार जागा
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 5:13 PM

मुंबई : आगामी टी-20 विश्वचषकाला(ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेला अवघे काही दिवस राहिले आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याआधीच अंतिम 15 खेळाडूसंह 3 राखीव खेळाडूंची यादी जाहीर केली होती. पण भारतीय संघ (Team India) हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करण्याची मुभा भारताला होती. त्यात आय़पीएलमधील खेळाडूंच्या प्रदर्शनानंतर संघात बदल होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसारच पहिला बदल झाला असून शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) संघात स्थान देण्यात आलं असून अक्षर पटेलला (Akshar Patel) राखीव खेळाडूंमध्ये बसवण्यात आलं आहे.

टी 20 विश्वचषकासाठी भारत तयार

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

इतर बातम्या

पाकिस्तानशी भिडण्यापूर्वी भारताचा सामना ‘या’ दोन संघाशी, सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाला नकार, वाचा नेमकं कारण काय?

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

(Shardul thakur replaces Akshar Patel in Indias T20 World cup squad)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.