T20 वर्ल्ड कपसाठी निवडलं नाही, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने 4 बॉलमध्ये न्यूझीलंडला दिला दणका

त्याच्या भन्नाट गोलंदाजीसमोर न्यूझीलंडची बोलती बंद

T20 वर्ल्ड कपसाठी निवडलं नाही, टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने 4 बॉलमध्ये न्यूझीलंडला दिला दणका
team india Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 3:54 PM

मुंबई: टीम इंडियाची सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीज सुरु आहे. त्याचवेळी इंडिया ए ची न्यूझीलंड ए विरुद्ध वनडे मालिका सुरु आहे. सीनियर टीम इंडियातून खेळलेले अनेक क्रिकेटपटू इंडिया ‘ए’ टीममध्ये खेळत आहेत. भविष्यात सिनियर टीममध्ये निवड करण्यासाठी इंडिया ‘ए’ मधील परफॉर्मन्स लक्षात घेतला जाणार आहे. म्हणूनच इंडिया ए टीममधून खेळणारे क्रिकेटपटू आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतायत.

संकटमोचकाची भूमिका

यात शार्दुल ठाकूरच नाव आघाडीवर आहे. शार्दुलकडे टेस्ट आणि वनडे टीममधून खेळण्याचा मोठा अनुभव आहे. टीम इंडियासाठी त्याने अनेकदा संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. गरज असताना विकेट काढून दिल्या आहेत तसंच बॅटनेही कमाल केलीय. उत्तम ऑलराऊंडर क्रिकेटपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.

किती विकेट घेतल्या?

याच शार्दुलने इंडिया ए कडून खेळताना न्यूझीलंड ए टीमची पार वाट लावलीय. त्याच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने आज न्यूझीलंड ए च्या फलंदाजांना चांगलच हैराण केलंय. शार्दुलने आज जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 8.2 ओव्हर्समध्ये 32 धावा देऊन 4 विकेट घेतल्या.

टॉप ऑर्डरला दणका दिला

शार्दुलने न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरला दणका दिला. त्यानंतर लोअर मिडल ऑर्डरचा फलंदाज मायकल रिपॉनला सुद्धा आऊट केलं. शार्दुलच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव 167 धावात आटोपला.

भेदक मारा

शार्दुलने आपल्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये चाड बोजला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर डेन क्लीवर आणि रॉबर्ट ओ डॉनेलचा विकेट घेतला. अखेरीस त्याने 61 रन्सची इनिंग खेळणाऱ्या मायकल रिपॉनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. न्यूझीलंडचा डाव 40.2 षटकात आटोपला.

टीम बाहेर होताच कौशल्य दाखवलं

शार्दुलला टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. ठाकूरला हरारेमधील सामन्यानंतर टीम इंडियातून ड्रॉप करण्यात आलं. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीजसाठी टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. टीम बाहेर होताच, त्याने आपलं गोलंदाजी कौशल्य दाखवून दिलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.