Suryakumar Yadav Catch : सूर्याच्या कॅचवरुन राडा करणाऱ्यांच दक्षिण आफ्रिकेच्याच प्रसिद्ध खेळाडूने तोंड केलं बंद

Suryakumar Yadav Catch : T20 World Cup 2024 : टीम इंडियाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला. अटी-तटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. यावेळी सूर्यकुमार यादवने एक अफलातून झेल पकडला. बाऊंड्री लाइनजवळ पकडलेल्या या कॅचवर काही जणांना संशय आहे. या आक्षेपांना आता दक्षिण आफ्रिकेच्याच प्रसिद्ध खेळाडूने प्रत्युत्तर दिलय.

Suryakumar Yadav Catch : सूर्याच्या कॅचवरुन राडा करणाऱ्यांच दक्षिण आफ्रिकेच्याच प्रसिद्ध खेळाडूने तोंड केलं बंद
suryakumar yadav Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 9:46 AM

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलचा सामना खूपच रंगतदार झाला. अगदी लास्ट ओव्हरपर्यंत श्वास रोखले गेले होते. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेविड मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक फलंदाज क्रीजवर होता. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूर्यकुमार यादवने बाऊंड्रीवर हैराण करुन सोडणारा एक झेल पकडला. टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यात या कॅचच खूप महत्वाच योगदान आहे. सूर्याच्या या कॅचवरुन आता वाद सुरु आहे. या वादांदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू शॉन पॉलकने सूर्याच्या कॅचवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलय.

शॉन पॉलकने सूर्यकुमार यादवने कॅच मागच पूर्ण सत्य सांगितलं. पॉलकन टाइम्स ऑफ कराचीला मुलाखत दिली. “सूर्यकुमार यादवने मिलरचा जो कॅच पकडला, तो पूर्णपणे योग्य होता. त्यात कुठलीही कमतरता नव्हती. सूर्यकुमार यादवचा बाऊंड्रीच्या रोपच्या कुशनला पाय लागला नाही” असं शॉन पॉलकने म्हटलं आहे. पॉलकने सूर्याच्या कॅचच कौतुक केलं. या मॅचच्यावेळी पॉलक सुद्धा मैदानात उपस्थित होते. यावरुन टीम इंडियावर होणारे आरोप तथ्यहीन असल्याच स्पष्ट होतं.

सत्य काय ते सांगितलं

सूर्यकुमार यादवने या कॅचची शनिवारपासून चर्चा आहे. एकाबाजूला सूर्यकुमार यादवच भरपूर कौतुक झालं. दुसऱ्याबाजूला त्याचा पाय बाऊंड्री रोपला लागल्याचा आरोप झाला. बाऊंड्री रोप वास्तविक रेषेपासून मागे हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. आयसीसीच्या बाऊंड्री नियमांनुसार हा सिक्स आहे पण अंपायर्सनी घाईगडबडीत चुकीचा निकाल दिला असा आक्षेप आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनेच सत्य काय ते सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.