IND vs SL : कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शिखर धवनचं पहिलं ट्विट, म्हणतो, ‘देशाचं नेतृत्व करताना…’

'देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार', असं ट्विट करत त्याने बीसीसीआय आणि सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. (Shikhar Dhawan First tweet After Catpain of team India Srilanka tour)

IND vs SL : कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शिखर धवनचं पहिलं ट्विट, म्हणतो, 'देशाचं नेतृत्व करताना...'
Shikhar Dhawanशिखर धवन
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 6:40 AM

मुंबई : भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलाय तर दुसरा एक संघ आता श्रीलंका दौऱ्यावर (India Tour of Sri Lanka) जातोय. जुलै महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात विराट-रोहित-बुमराह-शमी असे दिग्गज खेळाडू नसतील. या दिग्गजांशिवाय भारताला श्रीलंका दौऱ्यावर जायचं आहे. काही सिनियर, काही तरुण आणि अनेक नवीन चेहरे असलेल्या या संघाची धुरा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती देण्यात आली आहे. दुसरीकडे जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शिखर धवनने पहिलं ट्विट केलं आहे ते आभार व्यक्त करण्यासाठी…! (Shikhar Dhawan First tweet After Catpain of team India Srilanka tour)

काय म्हणाला शिखर?

देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. तुमच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार, असं ट्विट करत त्याने बीसीसीआय आणि सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. शिखर धवनच्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच तो भारताची कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे त्याच्यावर मोठं अपेक्षांचं ओझं असेल.

भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये, श्रीलंका दौऱ्यात शिखर-भुवीकडे टीम इंडियाची सूत्र

शिखर धवनने भारताकडून 34 कसोटी सामने, 145 एकदिवसीय सामने आणि 65 टी -20 सामने खेळले आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडलिरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना तसंच इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे धवनला श्रीलंका दौर्‍यासाठी कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. धवनशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार म्हणून संधी देण्यात आलीय.

भारताचा श्रीलंका दौरा

टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, तर दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 16 आणि 18 जुलै रोजी खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर 21, 23 आणि 25 जुलै रोजी तीन सामन्यांची टी -20 मालिका होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया

(Shikhar Dhawan First tweet After Catpain of team India Srilanka tour)

हे ही वाचा :

मोहम्मद सिराज कसा खेळणार? विराटला प्रश्न; हरभजन सिंगने भारतात बसून चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवला!

IND vs SL : भारताचा श्रीलंका दौरा, सलामीला कोण उतरणार?, मधल्या फळीत कुणाला संधी? पाहा…

IND vs SL : युजवेंद्र चहल ते कुलदीप यादव, फिरकीच्या जोडीला दीपक-नवदीपचं वेगवान अस्त्र, भारताचा गोलंदाजांचा ताफा कसा?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.