शिखर धवन आणि राहुल द्रविड मध्ये कसं नातं आहे? स्वत: कॅप्टनने सांगितलं
भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु झाली आहे. काल पोर्ट ऑफ स्पेन येथे पहिला सामना झाला.
मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु झाली आहे. काल पोर्ट ऑफ स्पेन येथे पहिला सामना झाला. या सीरीज साठी टीम इंडियाच्या सिनीयर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यात नियमित कर्णधार रोहित शर्माचा (Rohit sharma) समावेश आहे. त्यामुळे संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आलं आहे. शिखर धवनने बीसीसीआय टीव्हीवर बोलताना, युवा खेळाडूंच कौतुक केलं. युवा खेळाडूंबरोबर तो स्वत: कसा वागतो, त्यांना कशा पद्धतीने प्रेरित करतो, त्या बद्दल धवनने बीसीसीआय टीव्हीवर बोलताना सांगितलं.
मी अनुभव शेयर करतो
धवनने सांगितलं की, “तो टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसोबत त्याचे अनुभव शेयर करतो. मानसिक दृष्ट्या त्यांना उत्तम स्थिती मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो” “स्वत:च प्रत्येकाचं एक कौशल्य असतं. मी मानसिक मजबुतीबद्दल बोलतोय. जीवनात कसं पुढे जाता येतं. काही खेळाडूंनी आयपीएल आणि राज्य संघांकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. म्हणूनच ते इथे आहेत. आमच्याकडे मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आहे. युजवेंद्र चहल, दीपक हुड़्डा आहे. हे खेळाडू चांगली कामगिरी करतील” असा विश्वास धवनने व्यक्त केला.
राहुल द्रविड सोबत कसं नातं
संघाचे हेड कोच राहुल द्रविड आणि आपल्यामध्ये चांगलं बॉन्डिंग असल्याचं धवनने सांगितलं. अलीकडेच धवनने इन्स्टाग्रामवर एक रील शेयर केली होती. ज्यात स्वत: राहुल द्रविड होते. “आधी टीम बॉन्डिंग साठी डिनर व्हायचे. पण आता रील्स माध्यमातून एकत्र रहाण्याचा फायदा होतो” असं धवन म्हणाला. “राहुल भाई बरोबर माझं चांगलं नातं आहे. आम्ही एकत्र श्रीलंकेला गेलो होतो. तिथे त्यांच्याबरोबर चांगला बॉन्ड तयार झाला. आमच्या दोघांमध्ये एक चांगलं अंडरस्टँडिंग आहे. मी लगेच सगळ्यांबरोबर मिसळून जातो. तो माझा स्वभाव आहे. मी अलीकडेच एक रील शेयर केल होती. त्यात राहुल भाई होते. आता रील्स आहेत, आधी डीनर व्हायचा. सगळे एकत्र येतात, तेव्हा खूप चांगलं वाटतं” असं धवन म्हणाला.