IND vs BAN: पहिल्या वनडेतील धक्कादायक पराभवानंतर टीम मीटिंगमध्ये काय घडलं? शिखर धवनने सांगितलं सत्य

IND vs BAN: विजय सहज टप्प्यात असताना सुद्धा टीम इंडियाचा जिव्हारी लागणारा पराभव झाला....

IND vs BAN: पहिल्या वनडेतील धक्कादायक पराभवानंतर टीम मीटिंगमध्ये काय घडलं? शिखर धवनने सांगितलं सत्य
shikhar dhawan Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 5:54 PM

ढाका: भारतीय टीमला बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडे मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. कमी धावसंख्या बनवूनही टीम इंडियाने विजयाच्या दिशेने पावल टाकली होती. टीम इंडिया विजयापासून एक पाऊल दूर होती. पण मेहेदी हसन मिराजने मुस्ताफिजुर रहमानसोबत 10 व्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने टीम इंडियाच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला. आता बुधवारी होणारा दुसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. ओपनर शिखर धवनने, दुसऱ्या वनडेआधी टीम मीटिंगमध्ये कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली, त्याची माहिती दिली.

हेड कोचबद्दल म्हणाला…

शिखर धवनकडे वेगवेगळ्या कोचेसच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, त्याबद्दलही धवनने आपलं मत मांडलं. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड आहेत. पण अलीकडेच न्यूझीलंड दौरा झाला. त्यावेळी एनसीएचे प्रमुख व्ही.व्ही.एस लक्ष्मण या दौऱ्यात हेड कोच होते.

दुसऱ्या वनडेमध्ये काय होणार?

टीम इंडियासाठी दुसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण टीम इंडियाने हा सामना गमावला, तर ते सीरीज हरतील. त्यामुळे मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला विजय आवश्यक आहे. टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’ वाला आहे.

दुसऱ्या वनडेआधी धवन महत्त्वाची गोष्ट बोलला

“दुसरा वनडे सामना खेळण्याआधी आमच्यामध्ये आत्मविश्वास आहे. सीरीजचा पहिला सामना गमावण्याची आमची ही पहिली वेळ नाही. पुनरागमन कसं करायच, ते आम्हाला माहित आहे. बांग्लादेशची टीम चांगलं क्रिकेट खेळली. मागचा सामना रोमांचक झाला. टोटल कमी होती. पण अखेरीस ते जिंकले. सहसा असं होत नाही. ते चांगलं क्रिकेट खेळले. याच श्रेय त्यांना जातं. टीम बैठकीत आम्ही या मुद्यावर चर्चा केली. आम्हाला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही आपल्या खेळाच विश्लेषण केलं” असं शिखर धवन म्हणाला.

फरक पडत नाही

धवनने अनेकदा भारतीय क्रिकेट टीमच नेतृत्व केलय. लक्ष्मण सोबतही काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. द्रविड यांच्या कोचिंगमध्ये सुद्धा खेळला आहे. धवनला वेगवेगळ्या कोचेसबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रत्येक सीरीजमध्ये वेगवेगळ्या कोचेसची स्टाइल आत्मसात करण्यात अडचण येते का? त्यावर धवनने उत्तर दिलं की, “असं होतं नाही. मी वेगवेगळ्या कोचेसच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा मी आनंद घेतो. मी दोघांनी बऱ्याच काळापासून ओळखतोय. माझं दोघांबरोबरही चांगलं जमतं. हे कठीण नाहीय. मी गेल्या 10-12 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. माझा मित्रत्वाचा व्यवहार असतो. मी कोणासोबतही सहज मिसळून जातो. मी प्रत्येक स्थितीमध्ये खूश आहे”

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.