Raj Kundra arrest : राज कुंद्राच्या अटकेनंतर क्रिकेटर अजिंक्य रहाणे ट्रोल, वाचा काय आहे कारण?

राज कुंद्राला अटक केल्यानंतर त्याच्या साथीदारांनाही अटक केली जात आहे. पण या सर्वात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे ट्रोल होत असून यामागील कारण त्याचे एक ट्विट आहे.

Raj Kundra arrest : राज कुंद्राच्या अटकेनंतर क्रिकेटर अजिंक्य रहाणे ट्रोल, वाचा काय आहे कारण?
राज कुंद्राच्या अटकेनंतर अजिंक्य रहाणेला ट्रोल केले जात आहे.
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 6:07 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने सोमवारी रात्री राजला बेड्या ठोकल्या. अश्लिल चित्रपट बनवल्याचा आणि अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारीत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान राजला अटक केल्यानंतर अचानक भारतीय संघातील क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला नेटकरी ट्रोल करु लागले आहेत. याचे कारण रहाणेचे काही वर्षांपूर्वीचे एक ट्विट आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (IPL) सुरुवातीच्या काळात अजिंक्य रहाणे हा शिल्पा शेट्टीच्या मालकीचा संघ राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. त्यावेळी शिल्पाचा नवरा जो संघाचा सहमालकही होता. त्याला एका ट्विटमध्ये मेन्शन करत अजिंक्यने ‘तुम्ही खूप चांगले काम करत आहात सर’ असं लिहिलं होतं. त्यावर राज यानेही रिप्लाय करत ‘धन्यवाद! तू येऊन लाईव्ह पाहू शकतोस’ असा रिप्लायही केला होता. ज्यावर रहाणेने पुन्हा रिप्लाय करत ‘मी नक्कीच भेट देईन’ असंही लिहिलं होतं. हे ट्विट 19 ऑक्टोबर 2012 रोजीचे असून तब्बल 9 वर्षानंतर काही नेटकऱ्यांनी हे ट्विट शोधून रहाणेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अजिंक्य रहाणेच्या संबधित ट्विटचा फोटो व्हायरल करत नेटकरी रहाणेला कमालीचे ट्रोल करत आहेत. अनेक मीम्स तयार करुन नेटकरी रहाणेला ट्रोल करत आहेत. यातीलच काही ट्विट्स…

संबंधित बातम्या :

Raj Kundra case : मुंबई ते लंडन चालणाऱ्या अश्लील चित्रपट रॅकेटची संपूर्ण माहिती, राज कुंद्राच्या आयटी हेडला अटक

Raj Kundra case : 30-40 अ‍ॅप्स, शेकडो अश्लील व्हिडीओ, भलं मोठं भांडार मुंबई पोलिसांच्या हाती, राज कुंद्रांचा पाय खोलात

(Shilpa Shettys Husbend Raj Kundra Arrested after that Cricketer Ajinkya Rahanes Tweet of raj kundra went Viral)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.