INDvsWI: 25 वर्षाचा वेस्ट इंडिजचा ‘हा’ फलंदाज एकटाच मॅच फिरवू शकतो, पण भारत दौऱ्यात संघात स्थान नाही, कारण….

भारताविरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या सीरीजसाठी वेस्ट इंडिजने संघाची (West Indies Criket Team) घोषणा केली आहे.

INDvsWI: 25 वर्षाचा वेस्ट इंडिजचा 'हा' फलंदाज एकटाच मॅच फिरवू शकतो, पण भारत दौऱ्यात संघात स्थान नाही, कारण....
West indies cricket team (Photo: CWI)
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 2:08 PM

नवी दिल्ली: भारताविरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या सीरीजसाठी वेस्ट इंडिजने संघाची (West Indies Criket Team) घोषणा केली आहे. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) या संघाचे नेतृत्व करणार आहे. पोलार्डच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर येणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघात आक्रमक फलंदाज शिमरोन हेटमायरला (Shimron Hetmyer) स्थान मिळू शकलेले नाही. शिमरोन हेटमायरला संघात स्थान न मिळण्यामागे कारण आहे, त्याचा फिटनेस. या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचे मुख्य कोच फिल सिमन्स यांनी फिटनेसबद्दल हेटमायरच्या दृष्टीकोनावर नाराजी व्यक्त केली होती. हेटमायर वेस्ट इंडिजच्या नव्या पीढीच्या प्रतिभावंत फलंदाजांपैकी एक आहे. अंडर 19 मधून पुढे आलेला हेटमायरमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. पण स्वत:च्या फिटनेसबद्दल हा खेळाडू तितका सजग नाहीय, त्यामुळे भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

कोच म्हणतात, ते पाहून दु:ख होतं.

25 वर्षाचा हा युवा फलंदाज इंग्लंड विरुद्धच्या सीरीजआधी फिटनेसमध्ये फेल झाला होता. त्यानंतरही तो फिटनेस टेस्ट पास करु शकलेला नाही. “स्वत:ला आणि संघातील सहकाऱ्यांना हेटमायरकडून निराशा मिळते, ते पाहून दु:ख होतं” असं फिल सिमन्स म्हणाले होते. “टीमने इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आम्ही हाच संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी खूप चांगला खेळ केला. भारतातही या संघाकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे” असे मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स म्हणाले. वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धची टी ट्वेंन्टी सीरीज ३-२ अशी जिंकली.

16 फेब्रुवारीपासून टी 20 सीरीज वेस्ट इंडिजचा संघ 16 फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 16,18 आणि 20 फेब्रुवारीला कोलकात्याच्या मैदानावर हे सामने होतील. याआधी सहा, नऊ आणि 11 फेब्रुवारीला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल.

shimron hetmyer out as west indies name squad for t20 is against india

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.