Ruturaj Gaikwad ने ज्याला 7 SIX मारले, तो गोलंदाज कोण आहे? पहा त्याची अजब-गजब 360 डिग्री Action Video
VIDEO मध्ये या गोलंदाजाची अजब-गजब 360 डिग्री Action पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल....
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने तुफानी बॅटिंग केली. त्याने 220 धावांच्या इनिंगमध्ये 16 षटकार लगावले. उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य टीमवरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने ही कामगिरी केली. यूपीने या मॅचमध्ये 6 गोलंदाजांना संधी दिली. ऋतुराजने फक्त एक गोलंदाज सोडून बाकी सर्वांच्या बॉलिंगवर षटकार ठोकले. ऋतुराजने शिवा सिंह या गोलंदाजाविरोधात सर्वाधिक सिक्स मारले. शिवा सिंह आता 23 वर्षांचा असून तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.
यूपीच्या कुठल्या बॉलरला सर्वाधिक सिक्स?
ऋतुराज गायकवाडने 16 पैकी सर्वाधिक 9 सिक्स शिवा सिंहच्या गोलंदाजीवर मारल्या. यात एकाच ओव्हरमधील 7 सिक्स आहेत. गायकवाडने शिवा सिंहची जबरदस्त धुलाई केली. यूपीचा हा गोलंदाज आपल्या बॉलिंग Action मुळे चर्चेत आला होता.
अंपायरचा बॉलिंगवर आक्षेप
2018 साली पश्चिम बंगाल विरुद्ध एका अंडर 23 च्या सामन्यात शिवा सिंहने 360 डिग्री फिरुन गोलंदाजी केली होती. अंपायरने त्यावेळी शिवाच्या बॉलिंग Action वर आक्षेप घेतला होता. बॉलला डेड ठरवलं होतं.
शिवा सिंह काय म्हणाला?
अंपायरने Action अमान्य केल्यानंतर त्यावेळी शिवा सिंह म्हणाला होता की, “360 डिग्री एक्शनमध्ये गोलंदाजी करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा त्याने अशी गोलंदाजी केलीय. त्यावेळी कोणी त्यावर आक्षेप घेतला नव्हता”
संपूर्ण मॅचमध्ये ऋतुराजने शिवाच्या गोलंदाजीवर किती धावा ठोकल्या?
शिवा सिंह आज आपल्या बॉलिंग एक्शनमुळे नव्हे, तर 7 षटकारांमुळे चर्चेत आहेत. ऋतुराज गायकवाडने त्याच्या एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारल्या. ऋतुराजने शिवाला एकूण 9 सिक्स मारुन डबल सेंच्युरी पूर्ण केली. शिवा सिंह विरोधात ऋतुराजने 35 चेंडूत 76 धावा वसूल केल्या. शिवा सिंह आज यूपीकडून सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला.
Weirdo…!! Have a close look..!! pic.twitter.com/jK6ChzyH2T
— Bishan Bedi (@BishanBedi) November 7, 2018
करिअरमध्ये प्रगती कशी केली?
शिवा सिंहने यूपीसाठी लिस्ट ए मध्ये 2018 साली डेब्यु केला होता. ती विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा होती. 2018 साली भारताकडून तो अंडर 19 वर्ल्ड कपही खेळलाय. त्याशिवाय 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेद्वारे टी 20 मध्ये डेब्यु केला होता.