IND vs SL: Shivam Mavi कडून LIVE मॅचमध्ये इरफान पठानची बोलती बंद
IND vs SL: इरफान पठान लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो शिवम मावीबद्दल काय म्हणाला?
मुंबई: वानखेडे स्टेडियमवर पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला 2 धावांनी हरवलं. हा सामना खूपच रोमांचक ठरला. टीम इंडियाच्या विजयात वेगवान गोलंदाज शिवम मावीने महत्त्वाची भूमिका बजावली. शिवम मावीने या मॅचमधून डेब्यु केला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 22 धावा देऊन त्याने 4 विकेट काढल्या. त्याचा इकॉनमी रेट प्रतिओव्हर 5.50 होता. इतकी दमदार कामगिरी करण्यापूर्वी शिवम मावीच्या Action मध्ये कमतरता शोधली जात होती. मॅचमध्ये कॉमेंट्री करणारा इरफान पठान मावीच्या गोलंदाजी Action मधील कमतरता सांगत होता.
मावीमध्ये कुठली कमतरता?
इरफान पठानने शिवम मावीच्या गोलंदाजी Action बद्दल काही निरीक्षण नोंदवली. शिवम मावी वेगवान चेंडू टाकतो, तेव्हा त्याचा चेहरा वरच्या बाजूला असतो. त्यामुळे मावी शेवटपर्यंत फलंदाजाला पाहू शकत नाही. इरफान पठानच्या मते मावीची ही कमतरता त्याला भारी पडू शकते. मावीने कमालीची कामगिरी करुन टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.
पहिल्याच ओव्हरमध्ये काढली विकेट
शिवम मावीने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढली. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार खाल्ला. पण त्यानंतर पथुम निसांकाला एका सुंदर इनस्विंगवर बोल्ड केलं. पुढच्याच ओव्हरमध्ये मावीने धनंजय डिसिल्वाचा खेळ संपवला. मावीची डेथ ओव्हर्समध्ये कमाल
शिवम मावीने आपल्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या. त्यानंतर पुढच्याच दोन ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. मावीने 12 चेंडूत फक्त 5 धावा दिल्या. या दरम्यान त्याने दोन विकेट काढल्या. मावीने पावरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट काढून आपलं टॅलेंट सिद्ध केलं.
टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 162 धावा केल्या. श्रीलंकेच्या टीमने 160 रन्स केल्या. फक्त 2 धांवी टीम इंडियाने विजय मिळवला. 23 चेंडूत 41 धावा करणारा दीपक हुड्डा प्लेयर ऑफ द मॅच ठरला.