IND vs SA: ‘पाकिस्तान को मरवाना नही हैं’, टीम इंडियाची बॅटिंग पाहून Shoaib Akhtar टेन्शनमध्ये, VIDEO

IND vs SA: या मॅचवर पाकिस्तानच जास्त लक्ष आहे. शोएब आणि पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी टेन्शनमध्ये आहेत.

IND vs SA: 'पाकिस्तान को मरवाना नही हैं', टीम इंडियाची बॅटिंग पाहून Shoaib Akhtar टेन्शनमध्ये, VIDEO
Shoaib-AktharImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 6:40 PM

लाहोर: पाकिस्तानने आज टी 20 वर्ल्ड कपमधला पहिला विजय मिळवला. त्यांनी नेदरलँडला हरवलं. पाकिस्तानने मॅच जिंकली असली, तरी त्यांचं सर्व लक्ष भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर आहे. कारण ग्रुपमधील स्थिती लक्षात घेता, भारताच्या विजयावर पाकिस्तानचा सेमीफायनलचा प्रवास अवलंबून आहे. पाकिस्तानचे या वर्ल्ड कपमधील अजून दोन सामने बाकी आहेत. बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना खेळायचं आहे.

पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स चिंतेत

पाकिस्तानला या दोन मॅच जिंकाव्याच लागतील. पण त्यांना अन्य टीम्सच्या जय-पराजयावर सुद्धा अवलंबन रहाव लागणार आहे. आज भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकावं अशी पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.

शोएबने पोस्ट केला व्हिडिओ

आता पर्थवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरु आहे. या मॅचमध्ये भारताची फलंदाजी फ्लॉप ठरली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 134 धावांच सोपं लक्ष्य दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमी चिंतेता आहेत.खासकरुन शोएब अख्तर. टीम इंडियाची बॅटिंग सुरु असतानाच शोएबने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. दक्षिण आफ्रिकेचा लुंगी निगीडी टीम इंडियासाठी घातक गोलंदाज ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 4 विकेट काढल्या.

शोएबने व्हिडिओत काय म्हटलय?

भारताची टॉप ऑर्डर आज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर कोसळली. ही पडझड पाहून टीव्हीसमोर मॅच पाहणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर टेन्शनमध्ये आलाय. त्याने टीम इंडियाच्या बॅटिंगवर निराशा प्रगट केली. “पाकिस्तानला टुर्नामेंटमध्ये ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकावी लागेल, हे मी आधीच म्हटलय. पण चार विकेट आधीच गेल्यात. आता पुढे काय होणार, ठाऊक नाही. पाकिस्तान को मरवाना नही हैं” असं त्याने म्हटलय.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.