‘Jos Buttker नव्हे कटलर!’ रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तर असं का म्हणाला?
Jos Buttker: क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक माजी खेळाडू समालोचनाकडे वळले आहेत. आयपीएलमुळे (IPL) त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळतेय. काही खेळाडू चॅनल्सवर जाऊन विश्लेषकाची भूमिका पार पाडतात.
लाहोर: क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक माजी खेळाडू समालोचनाकडे वळले आहेत. आयपीएलमुळे (IPL) त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळतेय. काही खेळाडू चॅनल्सवर जाऊन विश्लेषकाची भूमिका पार पाडतात, तर काही खेळाडू आपल्या स्वत:च्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांशी संवाद साधत असतात. सध्या क्रिकेट विश्लेषकाच्या भूमिकेत असेलला असाच एक खेळाडू म्हणजे शोएब अख्तर (Shoaib Akhtar). पाकिस्तानचा हा माजी वेगवान गोलंदाज क्रिकेटच्या खेळणाऱ्या प्लेयर्सबद्दल आपली मत सातत्याने मांडत असतो. अख्तरने अलीकडेच जोस बटलरच्या (Jos Buttler) फॉर्मबद्दल आपलं मत व्यक्त केलं. इंग्लंडने बेन स्टोक्सच्या जागी जोस बटलरला वरती फलंदाजीला पाठवलं, तर बटलर इंग्लंडचा सुपरस्टार ठरु शकतो, असं शोएबने म्हटलं आहे. शोएब अख्तर काही वेळा वादग्रस्तही बोलतो. त्यामुळे वाद निर्माण होतात.
विराटने कॅप्टनशिप सोडली, त्यावर भाष्य केलं
मध्यंतरी त्याने विराट कोहलीने कॅप्टनशिप सोडली, त्याबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी विराटच व्यक्तीगत जीवन आणि अनुष्का शर्माबद्दलही तो बोलला होता. त्यावरुन विरुष्काच्या फॅन्सनी शोएब अख्तरला जबरदस्त ट्रोल केलं होतं. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या जोस बटलरने मागच्या सामन्यात शतक झळकावलं. यंदाच्या IPL 2022 सीजनमधलं हे पहिलं शतक आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 23 धावांनी विजय मिळवला. बटलरने 66 चेंडूत शतक झळकावलं. यात 11 चौकार आणि पाच षटकार लगावले.
एक परफेक्ट प्लेयर
“जोस बटलर हे एका मोठ्या जादूगाराचं नाव आहे. तो चांगल्या तसंच खराब खेळपट्टीवरही धावा करु शकतो. बटलर एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला जेवढं श्रेय मिळालं पाहिजे, तेवढं मिळालेलं नाही. जोस बटलर एक परफेक्ट प्लेयर आहे” असं शोएब अख्तर ‘एसके मॅच की बात’ कार्यक्रमात बोलताना म्हणाला.
बटलर बन जायेगा कटलर
आज आयपीएलच्या तेराव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना होत आहे. मागचे दोन्ही सामने या संघांनी जिंकले आहेत. RCB विरुद्ध RR सामन्यात कुठल्या खेळाडूचा खेळ बघायला आवडेल? या प्रश्नावर जोस बटलरने लगेच जोस बटलरचं नाव घेतलं. ‘आज जोस बटलर बन जायेगा कटलर’ असं रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणाला. आजच्या सामन्यात विजयासाठी राजस्थान रॉयल्सला आपली पसंती असल्याचं त्याने सांगितलं.