Shoaib Akhtar: शमीचा रिप्लाय शोएबच्या खूपच जिव्हारी लागला, मनातला राग काढताना म्हणाला…. VIDEO
Shoaib Akhtar: शोएब अख्तर आणि मोहम्मद शमीमध्ये सोशल मीडियावर एक वेगळच वॉर चालू आहे.
लाहोर: पाकिस्तानचा टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये पराभव झाला. इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेट राखून विजय मिळवला. पाकिस्तानी टीम पराभूत होऊन मायदेशी परतली आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद शमीमध्ये सोशल मीडियावर एक वेगळच वॉर चालू आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरने मन मोडल्याचा इमोजी शेयर केला होता. शमीने त्यावर भावा, याला कर्म म्हणतात, असा रिप्लाय दिला होता. आता शोएब अख्तरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात तो मोहम्मद शमीवर बोचरी टीका करत आहे.
शमीबद्दल शोएब अख्तर काय म्हणाला?
भारताचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. अख्तरने एक व्हिडिओ शेयर केलाय. त्यात त्याने टीम इंडियाने टुर्नामेंटमध्ये कुठे चूक केली, त्याबद्दल भाष्य केलय.
भारताच्या टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये शमीची गरज नव्हती, असं शोएबने म्हटलय. “भारताला आपली कॅप्टनशिप पहावी लागेल. गोलंदाजी विभागात कन्फ्यूजन होतं. ते अचानक शमीला घेऊन आले. तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. पण टीममध्ये तो फिट बसत नाही” असं शोएब अख्तर म्हणाला.
Sorry brother
It’s call karma ??? https://t.co/DpaIliRYkd
— Mohammad Shami (@MdShami11) November 13, 2022
भारताची चांगली कामगिरी, पण…
टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलपर्यंत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. सुपर 12 राऊंडमध्ये ग्रुप 2 मध्ये टीम इंडिया टॉपवर होती. भारताने 5 पैकी 4 सामने जिंकले. सेमीफायनलमध्ये मात्र टीम इंडियाचा इंग्लंडकडून 10 विकेटने दारुण पराभव झाला.
For context this what shoaib akhtar said about shami in his video.#ENGvPAK https://t.co/Ga3nHZuq4X pic.twitter.com/PRadlUg9ee
— Slayer (@Cricnerd36) November 13, 2022
पाकिस्तानने नशिबाने गाठली सेमीफायनल
मोहम्मद शमीने या वर्ल्ड कपमध्ये 6 सामन्यात 6 विकेट घेतले. पाकिस्तानची टीम ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या स्थानावर होती. पाकिस्तानची टीम सेमीफायनलपर्यंत पोहोण्याची शक्यता खूप कमी होती. पण नशिबाच्या बळावर पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली. तिथे न्यूझीलंडला हरवून त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला.