Sachin Tendulkar ला रक्तबंबाळ करायचं होतं, जाणूनबुजून हेल्मेटवर मारला होता बॉल, पाकिस्तानी गोलंदाजाची कबुली

"मला जाणूनबुजून सचिनला जखमी करायचं होतं. मी ठरवलच होतं की, काहीही करुन सचिनला दुखापत पोहोचवायचीच. इंजमाम सतत मला विकेटच्या लाइनमध्ये गोलंदाजी करायला सांगत होता"

Sachin Tendulkar ला रक्तबंबाळ करायचं होतं, जाणूनबुजून हेल्मेटवर मारला होता बॉल, पाकिस्तानी गोलंदाजाची कबुली
Sachin Tendulkar
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 3:01 PM

मुंबई: सार्वकालिन महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्यामधल्या स्पर्धेची नेहमीच चर्चा व्हायची. हे दोघे आमने-सामने असताना, क्रिकेट विश्वाची नेहमीच त्यांच्यावर नजर असायची. शोएब अख्तर आपल्या वेगाचा धाक दाखवयाचा, तर सचिन तोच वेग वापरुन चेंडूला सीमापार पाठवायचा. बॉ़डीलाइन (Bodyline) म्हणजे फलंदाजांच्या शरीराचा वेध घेणारे चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये शोएबचा समावेश होतो. शोएबला खेळताना अनेक फलंदाजांना दुखापत झाली आहे. शोएबला सचिनलाही दुखापत पोहोचवायची होती. त्याने तशा इराद्याने गोलंदाजी सुद्धा केली होती. आता स्वत: शोएब अख्तरने याने कबुली दिली आहे. 2006 सालच्या भारताच्या पाकिस्तान दौऱ्याची ही गोष्ट आहे. दोन्ही संघांमध्ये सीरीजमधला तिसरा कसोटी सामना सुरु होता. इंजमाम उल हक पाकिस्तानचा कॅप्टन होता. या सामन्यात शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरला फक्त आऊट करण्याचीच नाही, तर दुखापत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता.

हेल्मेटवर चेंडू मारला

“मला जाणूनबुजून सचिनला जखमी करायचं होतं. मी ठरवलच होतं की, काहीही करुन सचिनला दुखापत पोहोचवायचीच. इंजमाम सतत मला विकेटच्या लाइनमध्ये गोलंदाजी करायला सांगत होता. पण मला सचिनला दुखापतग्रस्त करायचं होतं. म्हणून मी त्याच्या हेल्मेटवर बॉल मारला. मला वाटलं सचिन जखमी झाला. पण मी व्हिडिओ पाहिला, तेव्हा मला समजलं की, सचिनला काहीही झालेलं नाहीय” असं शोएब स्पोर्ट्सकीडाशी बोलताना म्हणाला.

त्या दिवशी असिफचे अप्रतिम स्विंग पाहिले

“मी एका बाजूने जिथे सचिनला जखमी करण्याचा प्रयत्न करत होतो, त्यावेळी मोहम्मद आसिफ आपल्या स्विंग चेंडूंनी भारतीय फलंदाजांना नाचवत होता. मी असिफला त्या दिवशी ज्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहिलं, तशी गोलंदाजी अन्य कुठल्या गोलंदाजाकडून पहायला मिळाली नाही” असं शोएबने सांगितलं.

इरफान पठाणची हॅट्ट्रिक

हा तोच कसोटी सामना आहे, ज्यात डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठानने पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. इरफानने सलमान बट, यूनिस खान आणि मोहम्मद युसूफची विकेट काढली होती. पण तरिही या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.