श्रेयस अय्यर संघात परतला, ऋषभ पंतचं कर्णधारपद धोक्यात ? IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कमान कोणाच्या हातात ?

श्रेयस अय्यर 2021 च्या हंगामापर्यंत दिल्लीचा कर्णधार होता. पण 2021 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला आयपीएलपासून दूर राहावे लागले.

श्रेयस अय्यर संघात परतला, ऋषभ पंतचं कर्णधारपद धोक्यात ? IPLमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कमान कोणाच्या हातात ?
श्रेयस अय्यर संघात परतला, ऋषभ पंतचं कर्णधारपद धोक्यात ?
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 10:42 PM

नवी दिल्ली : आयपीएलचं उर्वरित सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने कँप लावून तयारी सुरू केली आहे. आणि उर्वरित संघ देखील महिन्याच्या अखेरीस तयारी सुरू करतील. पण सीझनच्या पहिल्या सहामाहीत पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी, आयपीएलचे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वीच मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येचे नाव कर्णधारपद आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे कर्णधारपदाबाबत आता दोन पर्याय आहेत. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर. दोघांपैकी कोण कर्णधार असेल? यावर गोंधळ उडाला आहे. (Shreyas Iyer returns to the team, Who is in charge of Delhi Capitals in IPL)

पहिल्या सत्रामध्ये ऋषभ संघाचा कर्णधार होता

श्रेयस अय्यर 2021 च्या हंगामापर्यंत दिल्लीचा कर्णधार होता. पण 2021 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला आयपीएलपासून दूर राहावे लागले. श्रेयस अय्यरच्या जागी व्यवस्थापनाने ऋषभ पंतला कर्णधार केले. ऋषभ संघाचा उपकर्णधार होता. ऋषभ पंतने दिल्लीसाठी चांगले कर्णधारपद भूषवले.

आठपैकी सहा सामने त्याने जिंकले. फक्त दोन गमावले. 12 गुणांसह दिल्ली सध्या पहिल्या स्थानावर आहे. संघाने चांगली कामगिरी केली आहे. आता अशा परिस्थितीत, व्यवस्थापनासमोर ऋषभ पंतला काढून टाकण्याचे एकही कारण नाही. दुसरीकडे श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीतून सावरला आहे. यावेळी तो फिटनेस प्रशिक्षकासह दुबईलाही पोहोचला आहे. कर्णधारपदाच्या मुद्द्यावर, फ्रँचायझीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की यूएईमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडूंना एक आठवडा विलगीकरणात रहावे लागेल. यानंतरच तो सरावासाठी मैदानात जाऊ शकेल आणि उर्वरित खेळाडूंना भेटू शकेल.

दिल्लीचा सामना हैदराबादशी होणार

यूएईमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या लेगचा पहिला सामना चेन्नई आणि मुंबई यांच्यात आहे. पण 22 सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल्सचा संघ मैदानात उतरेल. सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरीकडे, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या बोर्डकडून हिरवा सिग्नल मिळाला आहे आणि आयपीएलमध्ये सहभागी होताना दिसतील.

खांद्याच्या दुखापतीतून स्टीव्ह स्मिथही सावरला आहे. स्मिथ दिल्ली कॅपिटल्सच्या दुसऱ्या टप्प्यात उपलब्ध होईल. त्यामुळे सर्व फ्रँचायझींसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण दिल्लीला कर्णधारपदाचा मुद्दा लवकरात लवकर संपवावा लागेल. स्थायी कर्णधार श्रेयस अय्यरला पुन्हा कर्णधारपद मिळते की दिल्लीचा संघ ऋषभ पंतसोबत जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Shreyas Iyer returns to the team, Who is in charge of Delhi Capitals in IPL)

इतर बातम्या

PHOTO | पीटी उषाचा प्रशिक्षक ओएम नांबियार यांच्या निधनावर भावनिक संदेश, फोटोंसह शेअर केले संस्मरणीय क्षण

पीटी उषा यांचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांचे निधन, एएफआयने व्यक्त केला शोक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.