IND vs AUS : अहमदाबाद टेस्टच्या निकालाआधीच टीम इंडियाला झटका, KKR ला सुद्धा फटका बसणार?
IND vs AUS : अहमदाबाद टेस्ट मॅचचा 5 व्या दिवसाचा खेळ सुरु झाला होता, तितक्यात एक वाईट बातमी आली. सामना सध्या ज्या स्थितीमध्ये आहे, तिथून टीम इंडियाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाहीय.
IND vs AUS Test : अहमदाबाद टेस्ट मॅचचा 5 व्या दिवसाचा खेळ सुरु झाला होता, तितक्यात एक वाईट बातमी आली. श्रेयस अय्यरच्या दुखापतीशी संबंधित ही बातमी आहे. श्रेयस अय्यर या टेस्ट मॅचमधून बाहेर गेलाय. अय्यरला चौथ्या कसोटीच्या तिसऱ्यादिवशी लोअर बॅक इंजरीचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागल होतं. अय्यर दुखापतीमुळे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करु शकला नव्हता. आता दुसऱ्या इनिंगमध्येही तो बॅटिंग करु शकणार नाहीय.
सामना सध्या ज्या स्थितीमध्ये आहे, तिथून टीम इंडियाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाहीय. अहमदाबाद कसोटीचा आज लास्ट दिवस आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडिया बॅटिंगला उतरली, तरी श्रेयस अय्यरला फलंदाजी उतरण्याची वेळ येणार नाही.
याआधी कधी झालेली दुखापत?
दुखापतीनंतर श्रेयस अय्यर बीसीसीआय मेडीकल टीमच्या देखरेखीखाली आहे. त्याच स्कॅन करण्यात आलय. अय्यरला झालेली दुखापत नवीन नाहीय. याआधी श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीज दरम्यान त्याला लोअर बॅक इंजरीचा त्रास झाला होता. त्यानंतर एक महिना तो NCA मध्ये होता. त्यामुळेच बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. आता 2 टेस्ट मॅचमध्ये खेळल्यानंतर श्रेयस अय्यरच्या जुन्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलय. IPL मधूनही बाहेर?
BCCI ने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर सध्या फक्त अहमदाबाद कसोटीत खेळणार नाहीय. पण 17 मार्चपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे सीरीजमध्येही श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यत कमी आहे. श्रेयस अय्यरच्या या दुखापतीचा परिणाम आयपीएलवरही होऊ शकतो. श्रेयस अय्यर कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन आहे.