Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल शर्माच्या शोमध्ये श्रेयस अय्यरने दाखवली जादू, पाहून सगळेच हैराण

भारताचा मधल्या फळीतील क्रिकेटर श्रेयस अय्यर यांने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्याच्या सोबत रोहित शर्मा देखील पाहुणा म्हणून पोहोचला होता. कपिलच्या या शोमध्ये श्रेयस अय्यरने अशी जादू दाखवली की पाहून सगळेच हैराण झाले. त्याची ही गोष्ट कोणालाच माहित नव्हती.

कपिल शर्माच्या शोमध्ये श्रेयस अय्यरने दाखवली जादू, पाहून सगळेच हैराण
shreyas iyer
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 8:10 PM

Kapil Sharma Show : कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा दुसरा भाग समोर आला आहे. या शोमध्ये दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर पाहुणे म्हणून आले होते. कपिल शर्माच्या या शोमध्ये फलंदाज श्रेयस अय्यरने अशी कला दाखवली जी कोणालाच माहित नव्हती. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यर याने कपिल शर्माच्या शोमध्ये आपली जादू दाखवली, ज्याला पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि अर्चना पूरण सिंह देखील आश्चर्यचकित झाले.

कपिल शर्माच्या शोमध्ये श्रेयस अय्यर जादूगार बनलाय. श्रेयस अय्यरच्या जादूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कपिल शर्माला पत्त्यांची जादू दाखवत आहे. त्याने कार्ड्सच्या डेकमधून कपिल शर्माला एक कार्ड काढण्यास सांगतो. यानंतर कपिल शर्मा एक कार्ड काढतो. ते कोणतं कार्ड आहे ते अय्यरला दाखवलं जात नाही. पण नंतर श्रेयस अय्यर बरोबर तेच कार्ड काढतो. हे पाहून अर्चना आणि रोहित शर्मासह सर्व चाहत्यांना धक्का बसतो.

श्रेयस अय्यर कपिल शर्माला कोणाचे तरी नाव घेण्यास सांगतो आणि कपिल अर्चनाचे नाव घेतो. यानंतर, अय्यर अर्चनाच्या नावाच्या स्पेलिंगनुसार 7 कार्डे काढतो आणि कपिलला अर्चनाच्या नावाच्या स्पेलिंगनुसार कार्ड काढायला सांगतो.

कपिल त्यानुसार कार्ड काढतो, पण जे कार्ड कपिलने आधी काढले होते, ते अर्चनाच्या नावाचे स्पेलिंग असलेले संपल्यानंतर शेवटी तेच कार्ड निघते हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. हे पाहून सगळेच टाळ्या वाजवतात आणि अय्यरच्या जादूवर आनंद व्यक्त करतात.

किल्ले शिवनेरीवर 395 व्या शिवजयंतीचा जल्लोष, बघा खास झलक
किल्ले शिवनेरीवर 395 व्या शिवजयंतीचा जल्लोष, बघा खास झलक.
शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जोजवला पाळणा
शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जोजवला पाळणा.
मतोश्रीपुढं अखेरचं नतमस्तक, मनातील खदखद व्यक्त करत सोडली साथ अन्...
मतोश्रीपुढं अखेरचं नतमस्तक, मनातील खदखद व्यक्त करत सोडली साथ अन्....
भेटीवरून षडयंत्र रचणारा बीडचा 'तो' नेता कोण? धस म्हणाले, 100 टक्के...
भेटीवरून षडयंत्र रचणारा बीडचा 'तो' नेता कोण? धस म्हणाले, 100 टक्के....
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.