‘वेदना पचवणं सोपं नसतं’, दिल्लीने कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर श्रेयस अय्यरचं पहिल्यांदाच भाष्य

श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आता आयपीएलमधील केकेआर (KKR) फ्रेंचायजीचा कर्णधार आहे. कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयसला कॅप्टन बनवलं आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने 12.5 कोटी रुपयांची मोठी किंमत मोजून श्रेयसला विकत घेतलं.

'वेदना पचवणं सोपं नसतं', दिल्लीने कॅप्टनशिपवरुन हटवण्याच्या मुद्यावर श्रेयस अय्यरचं पहिल्यांदाच भाष्य
दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदावरुन हटवण्याच्या विषयावर श्रेयस अय्यरचं भाष्यImage Credit source: INSTAGRAM
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:54 AM

मुंबई: श्रेयस अय्यर (Shreyas iyer) आता आयपीएलमधील केकेआर (KKR) फ्रेंचायजीचा कर्णधार आहे. कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयसला कॅप्टन बनवलं आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने 12.5 कोटी रुपयांची मोठी किंमत मोजून श्रेयसला विकत घेतलं. त्याच्यातील नेतृत्व गुण हेरुनच त्याला संघाचं कर्णधार बनवण्यात आलय. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने जी कामगिरी केली ते पाहूनच त्याला केकेआरने कॅप्टन बनवलयं. श्रेयसने दिल्लीची साथ सोडली, त्यामागे ऋषभ पंतला कॅप्टन बनवणं हे एक प्रमुख कारण आहे. मागच्या सीजनमध्ये पहिल्या सत्रात श्रेयस दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळला नाही. त्यावेळी ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आलं. श्रेयस दुखापतीमधून सावरुन परतला, तेव्हा सुद्धा कॅप्टनशिप ऋषभकडेच ठेवली. त्यामुळे श्रेयसने अखेर दिल्लीचा संघ सोडला. आता श्रेयसने या विषयावर आपली बाजू मांडली आहे.

…तर माझं कर्णधारपद गेलं नसतं

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसला या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. ती दुखापत मोठा झटका होती की, दिल्लीचं कर्णधारपद जाणं. त्यावर अय्यरने दुखापत झाली नसती, तर कर्णधारपद गेलं नसतं, असं उत्तर दिलं.

“ती दुखापत माझ्यासाठी एक मोठा झटका ठरली. दुखापत झाली नसती, तर दिल्ली कॅपिटल्सने मला कर्णधारपदावरुन हटवलं नसतं” असं श्रेयसने सांगितलं. “2019-20 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात एक वातावरण निर्मिती झाली होती. त्याची प्रतिमा तुम्हाला 2021 मध्ये पहायला मिळाली. दिल्ली संघातील वातवरण कमालीचं होतं. प्रत्येक खेळाडू परस्परांना ओळखत होता. प्रत्यकेाला आपली कमकुवत बाजू आणि ताकत याची कल्पना होती” असे श्रेयसने सांगितलं.

दुखापतीनंतर श्रेयस अय्यर अधिक चांगला खेळाडू बनला

“काही वेळा काही गोष्टी चांगल्यासाठी घडतात. ही गोष्ट आपल्या नंतर लक्षात येते. न्यूझीलंडमध्ये मी जबरदस्त फॉर्ममध्ये होतो. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास भरला होता. कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये मी 500 धावा केल्या होत्या. त्यानंतर मला दुखापत झाली. ती गोष्ट माझ्या डोक्यात बसली. दुखापती नंतरच्या वेदना सहन करणं सोपं नसतं. दुखापत झाल्यानंतर ती बरी होण्यापर्यंतची प्रक्रिया खूपच कठीण असते. पण दुखापत माझ्यासाठी चांगली ठरली. मला दुखापत झाली नसती, तर आज मी जे आहे ते फक्त 50 टक्केच असतो. जे होत ते चांगल्यासाठीच घडतं” असं श्रेयसने सांगितलं.

shreyas iyer speaks on removing him from delhi capitals captainship rishabh pant ipl 2022

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....