Team india : रवी शास्त्रींशी अनेकदा मतभद व्हायचे, या पूर्व क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य
माजी फिल्डिंग कोच श्रीधर म्हणाले, रवी शास्त्री यांच्याशी अनेकदा माझे मतभेद व्हायचे. श्रीधर यांनी भारतीय ड्रेसिंगरुममधील अनुभव सांगत हे सर्वात खास दिवस असल्याचेही म्हटले आहे.
मुंबई : भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आता पायउतार झाले आहेत. रवी शास्त्रींच्या नंतर भारतीय टीमची कमान आता राहुल द्रवीड संभाळत आहे. राहुलला टीमच्या मुख्य कोचपदी बसवण्यात आले आहे. त्यामुळे वनडे, टी-20 चा कर्णधार आणि मुख्य कोच असे दुहेरी बदल टीम इंडियात झाले आहेत. या नव्या जोडीकडून टीमला भरघोस यशाची अपेक्षा आहे. रोहीत शर्माच्या नेतृत्वात टीमला आगामी विश्वचषक जिंकण्याचे वेध लागले आहेत.
माजी फिल्डिंग कोच श्रीधर म्हणाले…
माजी फिल्डिंग कोच श्रीधर म्हणाले, रवी शास्त्री यांच्याशी अनेकदा माझे मतभेद व्हायचे. श्रीधर यांनी भारतीय ड्रेसिंगरुममधील अनुभव सांगत हे सर्वात खास दिवस असल्याचेही म्हटले आहे. टीमची खराब कामगिरी कोचिंगसाठी चांगली संधी असते असेहे ते म्हणाले आहेत. श्रीधर टीममधील कोचिंग विभागाचा एक महत्वाचा भाग होते. त्यांनी टीमची फिल्डिंगमधील कामगिरी सुधारण्यात म्हत्वाची भूमिका बजावली आहे.
रवी शास्त्री यांच्याशी अनेकदा मतभेद
त्यांनी बोलताना असेही म्हटले आहे की, सर्वात चांगल्या निर्णयावर पोहोचण्यासाठी मतभेद होणे गरजेचे असते. त्यामुळे मतभेद हे झाले पाहिजेत. ज्यावेळी भारतीय टीम 36 रनवर आऊट झाली होती. त्यावेळी टीमसाठी शिकण्यासाठी मोठा धडा होता. त्यातून टीम खूप शिकली. खेळाडुंना समजून घेणेही फार गरजेचे असते. त्यामुळे त्यांना शिकवता येते. मानसिकरित्या सक्षम बनवता येते, असंही श्रीधर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी रवी शास्त्री यांचं जोमाने कौतुक केले आहे. त्यांच्याकडे चांगली निर्णयक्षमता आहे, त्याचा टीमला निश्चितच फायदा झाला, असेही ते म्हणाले आहेत.