IND vs AUS | टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडेत नाही खेळणार

IND vs AUS | या दोघांपैकी एका प्लेरयने रविवारी ऑस्ट्रेलियाला चांगलच चोपलय. पहिल्या दोन वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळले नाहीत. टीम इंडियाने काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध 399 धावांचा डोंगर उभारला.

IND vs AUS | टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडेत नाही खेळणार
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 11:49 AM

राजकोट : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका जिंकलीय. पहिले दोन्ही वनडे जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा वनडे सामना गुजरात राजकोटला होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या वनडे मालिकेत टीम इंडियाने काही प्रयोग करुन पाहिले. रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या दिग्गजांना आराम दिला. आता तिसऱ्या वनडे मॅचमध्येही काही बदल दिसणार आहेत. आगामी वनडे वर्ल्ड कपआधी हे सर्व प्रयोग करण्यात येत आहेत. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेआधी टीम इंडियात दोन बदल होणार आहेत. दोन प्रमुख खेळाडूंनी विश्रांती देण्यात येणार आहे. एकाने कालच ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक फटकावल होतं. हे दोन्ही प्लेयर आता थेट गुवहाटीमध्ये टीम इंडियाला जॉइंन करतील. टीम इंडियाच्या वनडे वर्ल्ड कप 2023 अभियानाला इथूनच सुरुवात होणार आहे.

ओपनर शुभमन गिल आणि ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर या दोघांना तिसऱ्या वनडेसाठी विश्रांती देण्यात येणार आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये तिसरा वनडे सामना होईल. काल दुसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिलने सेंच्युरी झळकवली. गिलची करीयरमधील ही सहावी आणि या वर्षातली पाचवी सेंच्युरी आहे. शुभमन गिलने यावर्षी न्यूझीलंड विरुद्ध दोन, बांग्लादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रत्येकी एक सेंच्युरी झळकवली आहे. यावर्षी त्याने T20 मध्येही सेंच्युरी झळकवली. 20 डावात 72.35 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत. 105.03 चा त्याचा स्ट्राइक रेट आहे. 2023 वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक धावांमध्ये गिल आघाडीवर आहे. भारतात पहिल्यांदा गिल त्याच होम ग्राऊंड मोहालीमध्ये खेळला.

दुसऱ्या वनडे अजून कोणाला विश्रांती दिलेली?

टीम मॅनेजमेंटकडून वर्कलोड मॅनेजमेंटवर काम केलं जातय. पहिल्या दोन वनडेत कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली खेळले नाहीत. आता राजकोटमध्ये हे दोघेही खेळताना दिसतील. त्यावेळी शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर बाहेर असतील. जसप्रीत बुमराहाला विश्रांती दिल्याने तो दुसरी वनडे खेळला नाही. दुसऱ्या वनडेसाठी बुमराहच्या जागी मुकेश कुमारचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. बुमराह राजकोटच्या तिसऱ्या शेवटच्या वनडे सामन्यात खेळेल.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.