Shubman Gill | ‘या’ 3 गोष्टी शुभमन गिलच्या फेव्हरमध्ये, त्यामुळे तो उद्या बनू शकतो टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन

Shubman Gill | श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत असताना, शुभमन कसा काय? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. असलेल्या अन्य 3 ते 4 जणांना फार कमी संधी आहे.

Shubman Gill | 'या' 3 गोष्टी शुभमन गिलच्या फेव्हरमध्ये, त्यामुळे तो उद्या बनू शकतो टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन
Shubhaman GillImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 1:18 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यापासून रोहित शर्मा 2023-25 च्या WTC सायकलमध्ये सुद्धा टींम इंडियाच नेतृत्व करणार का? हा प्रश्न विचारला जातोय. टीम इंडियाला नव्या कॅप्टनची आवश्यकता आहे. रोहित शर्माने कॅप्टनशिप सोडल्यास त्याच्यानंतर कोण? हा प्रश्न आहे. सध्या या प्रश्नाच उत्तर कोणाकडे नाहीय.

या प्रश्नाच उत्तर शोधायच झाल्यास भविष्यातील टीम इंडियाचा कॅप्टन बनण्यासाठी शुभमन गिल प्रबळ दावेदार आहे. श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत असताना, शुभमन कसा काय? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. कॅप्टन बनण्याआधी शुभमन गिलवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवता येऊ शकते.

हीच क्वालिटी त्याला कर्णधार बनवेल

शुभमन गिलने अंडर 19 लेवलवर तसच इंडिया ए टीमच सुद्धा नेतृत्व केलं नाहीय. रणजीमध्ये सुद्धा टीमच नेतृत्व करण्याचा अनुभव त्याच्याकडे नाहीय. शुभमन 2018 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा उपकर्णधार होता. शुभमनला खेळाची चांगली समज आहे. परिस्थितीनुसार कसं खेळायच, हे त्याला ठाऊक आहे. या क्वालिटीमुळे तो उद्या कॅप्टन बनू शकतो. रोहित शर्माकडून काही गोष्टी शिकण्यासाठी त्याला उपकर्णधार बनवता येईल.

भारतात वयाच्या 21 व्या वर्षी कोणाला कॅप्टन बनवलं?

शुभमन गिल आता फक्त अवघ्या 23 वर्षांचा आहे. टीम इंडियाला दीर्घकाळ नेतृत्व करु शकणाऱ्या खेळाडूची गरज आहे. त्यामुळे वयाचा फॅक्टर गिलच्या बाजूने आहे. याआधी ग्रॅम स्मिथला वयाच्या 22 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच कॅप्टन बनवण्यात आलं होतं. टेस्ट फॉर्मेटमध्ये सर्वाधिक मॅच जिंकणारा तो कॅप्टन आहे. स्मिथच नाही, भारतात वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी एका खेळाडूला कॅप्टन बनवण्यात आलं. त्यांच नाव आहे, मन्सूर अली खान पतौडी. 21 वर्ष 77 दिवस वय असताना पतौडींना कॅप्टन बनवण्यात आलं.

कुठला फॅक्टर गिलच्या बाजूने ?

फक्त वयच नाही, शुभमन गिलची फिटनेस लेवल सुद्धा कमालीची आहे. गिल कमालीची एथलीट आहे. त्याची बॉडी इंजरी प्रोन वाटत नाही. त्यामुळेच क्रॅम्पशिवाय तो मोठ्या इनिंग खेळतो.. तीन फॉर्मेटच्या 38 इनिंगमध्ये काय सिद्ध केलय?

शुभमन गिलकडे टॅलेंट आहे. त्याने क्रिकेट विश्वाला याची प्रचिती दिलीय. मागच्या एक वर्षात शुभमन गिल तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 38 इनिंग खेळलाय. यात त्याने 7 सेंच्युरी, 5 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. त्याची सरासरी 55 पेक्षा जास्त होती. विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा पुढचा स्टार म्हणून शुभमन गिलकडे पाहिलं जातय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.