शुभमन याच्या विकेटवरून वाद, ‘सॉफ्ट सिग्नल’ का मिळाला नाही?; आयसीसीने दिलं उत्तर
गिललाही आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे चेंडू जमिनीला टच झाल्याचं दोघांनाही वाटत होतं. गिल आऊट होणार नाही हे दोघांनाही वाटत होतं. या सामन्याचे थर्ड अंपायर इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रॉ हे आहेत.
लंडन | भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना सुरू आहे. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 8 विकेट देत 270 धावा करून दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे टीम इंडियाला 444 धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. भारतानेही हे आव्हान उचलून धरलं आहे. टीम इंडियानेही तीन विकेट देत दमदार 164 धावा केल्या आहेत. भारताला त्यामुळे भारताला आता फक्त 280 धावा कराव्या लागणार आहेत. भारत हे आव्हान आज पेलणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारताने हे आव्हान पार पाडल्यास तो मोठा चमत्कार घडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भारताने काल दुसऱ्या डावाला सुरुवात केली. भारताची सुरुवात अत्यंत चांगली झाली. मात्र, 41 धावा होताच भारताने आपली पहिली विकेट गमावली. शुभमन गिल 18 धावा करून बाद झाला. कॅमरन ग्रीनने स्लीपला शुभमनचा झेल घेतला अन् शुभमन बाद झाला. मात्र ही कॅच वादग्रस्त ठरली. त्यात शुभमनला सॉफ्ट सिग्नल नियमाचाही फायदा मिळाला नाही. असं का झालं? त्यावर आयसीसीने उत्तर दिलं आहे.
ग्रीनने डाइव्ह मारून एका हाताने गिलची कॅच पकडली. हा झेल पाहिल्यावर पहिल्यांदा वाटलं की चेंडू जमिनीला टच झालाय. त्यामुळे हे प्रकरण थर्ड अंपायरकडे गेलं. थर्ड अंपायरने रिप्ले पाहून गिल बाद असल्याचं सांगितलं. मात्र, रिप्ले पाहिल्यावर गिल बाद नसल्याचं काही फॅन्सचं म्हणणं आहे.
फोटो व्हिडीओ व्हायरल
या कॅचचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यातून चेंडू जमिनीला टच झाला की नाही हे दिसून येतं. थर्ड अंपायरच्या निर्णयावर कर्णधार रोहित शर्मा नाराज झाला तर गिललाही आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे चेंडू जमिनीला टच झाल्याचं दोघांनाही वाटत होतं. गिल आऊट होणार नाही हे दोघांनाही वाटत होतं. या सामन्याचे थर्ड अंपायर इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रॉ हे आहेत. केटलब्रॉ यांच्या या निर्णयानंतर प्रेक्षक संतप्त झाले. त्यांनी चीटर चीटरच्या जोरदार घोषणा दिल्या.
View this post on Instagram
सॉफ्ट सिग्नलचा फायदा का नाही?
या वादग्रस्त निर्णयापूर्वी गिलला सॉफ्ट सिग्नलचा फायदा का मिळाला नाही? असा सवाल केला जात आहे. त्यावर आयसीसीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गिलला सॉफ्ट सिग्नलचा फायदा का मिळाला नाही हे सांगण्याची गरज आली आहे. सॉफ्ट सिग्नलचा नियम जूनच्या सुरुवातीपासूनच बाद करण्यात आला आहे. म्हणजे जून 2023 नंतर हा नियम टेस्ट क्रिकेटला लागू होणार नाही. त्यामुळेच हा नियम या टेस्ट मॅचला लागू झाला नाही. त्यामुळे गिलला त्याचा फायदा मिळाला नाही, असं आयसीसीने म्हटलं आहे.
काय आहे नियम?
सॉफ्ट सिग्नल नियमानुसार, एखादा कॅच संदिग्ध असेल तर त्यावर फिल्ड अंपायर आपला निर्णय द्यायचे. त्यानंतर हे प्रकरण थर्ड अंपायरकडे पाठवलं जायचं. अशावेळी थर्ड अंपायरला संदिग्ध कॅचबाबत निर्णय घेताना कन्फ्यूझ झाला तर फिल्ड अंपायरचा निर्णयच कायम राहायचा.
सॉफ्ट सिग्नलवरही वाद
दरम्यान, सॉफ्ट सिग्नलच्या नियमावरही यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका दरम्यानच्या कसोटी सामन्यावेळी मार्नस लाबुशेनला मैदानावरील अंपायरने सॉफ्ट सिग्नलच्या नियमाने झेलबाद ठरवलं होतं. त्याची स्लीपमध्ये कॅच पकडण्यात आली होती. कॅच क्लिन नव्हती. मात्र थर्ड अंपायरकडे दोन्ही अंपायरचा निर्णय बदलण्याचे ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवला गेला.