WI vs IND 1st Test | आधी डान्स मग चान्स, असं Shubman Gill च करु शकतो, पाहा, VIDEO
WI vs IND 1st Test | शुबमन गिलच्या कॅचवर येण्याआधी त्याच्या डान्सवर जाऊया. वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील 63 वी ओव्हर संपल्यानंतर त्याने हा डान्स केला.
रोसेऊ : वेस्ट इंडिजचा दौरा असेल, तर कॅलिप्सोचे सूर कानावर पडतात. या सूरांनी मनाचा ताबा घेणं, स्वाभाविक आहे. वेस्ट इंडिजच्या मैदानात हे सूर बऱ्याचदा ऐकू येतात. डॉमिनिकामध्ये सुद्धा असंच झालं. ज्यावर शुबमन गिलची पावलं थिरकली. त्याने जबरदस्त डान्स केला. या डान्स नंतर शुबमनने चान्स घेऊन जबरदस्त कॅच पकडली. याच कॅचने वेस्ट इंडिजची पहिली इनिंग संपवली.
डॉमिनिका टेस्टमध्ये वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 150 रन्सवर आटोपली. बाद होणाऱ्या शेवटच्या फलंदाजाची कॅच शुबमन गिलने पकडली. गिलने जोमेल वारिकनची कॅच पकडली. त्याने 13 चेंडूंता सामना करताना फक्त 1 रन्स केला.
शुबमनने कधी केला डान्स?
शुबमन गिलच्या कॅचवर येण्याआधी त्याच्या डान्सवर जाऊया. वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील 63 वी ओव्हर संपल्यानंतर त्याने हा डान्स केला. ही ओव्हर संपलेली असताना, गिल मैदानावर कॅलिप्सोच्या सूरांवर थिरकताना दिसला.
आता गिल सुद्धा तसच करतो
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या शुबमन गिलमध्ये भविष्यातील विराट कोहलीला पाहिलं जातय. डॉमिनिकामध्ये शुबमन गिलने जे केलं, त्यात विराट कोहलीचा अंदाज होता. विराटला अनेकदा मैदानात डान्स करताना पाहिलय. आता गिल सुद्धा तसच करतो.
DO NOT MISS! Keep your eyes ? on the right side of the screen, we have a surprise Shubman Gill package for you!
He is truly enjoying the Caribbean atmosphere ? ???#INDvWIonFanCode #WIvIND pic.twitter.com/jZRlqFdofl
— FanCode (@FanCode) July 12, 2023
आधी डान्स, मग चान्स
गिलने आधी डान्स केला. मग त्याने कॅचचा चान्स घेतला. गिलने ही जबरदस्त कॅच घेतली. गिलने शॉर्ट लेगवर वारिकनची कॅच पकडली. त्याने डाइव्ह मारुन ही कॅच पकडली. आधी ही कॅच डाऊटफुल वाटली. गोलंदाजाला आणि कॅच पकडणाऱ्या गिलला सुद्धा सुरुवातीला विश्वास वाटला नाही. थर्ड अंपायरने निर्णय घेतला. वेगवेगळ्या अँगलमधून तपासल्यानंतर ही क्लीन कॅच असल्याच स्पष्ट झालं.
WHATTT! a catch shubman gill#WIvIND #INDvsWI pic.twitter.com/L0226OJV09
— lokeshkhera (@lokeshkhera29) July 12, 2023
गिलने पकडलेल्या कॅचसह डॉमिनिकामध्ये वेस्ट इंडिजची पहिली इनिंग संपली. शुबमनच्या या कॅचमुळे अश्विनचे पाच विकेट पूर्ण झाले. टेस्ट करीअरमध्ये 5 विकेट घेण्याची अश्विनची ही 33 वी वेळ आहे.